पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना जो स्वाभिमान एखाद्या खासदाराच्या अंगी दिसतो त्यापेक्षा काहीसा अधिक अभिमान अशा खासदाराबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये उतरतो जेव्हा तो संकटकाळी आपल्या सर्व विरोधावली बाजूला ठेवून पाण्यात उतरतो आणि पुरात अडकलेल्या आपल्या लाडक्या नागरिकांच्या मदतीला धावून जातो ही धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात मुसळधार पावसानंतर आलेल्या महापुरात अडकलेल्या वयोवृद्ध आजी दोन वर्षाचे लहान मुल व अन्य दोघे यांना वाचविण्यासाठी एनडीआरएफ च्या मदतीने खासदार ओमराजे निंबाळकर धावून आले.
संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसाने सोलापूर बीड धाराशिव हिंगोली संभाजीनगर आदी जिल्ह्यांची अवस्था भयंकर करून टाकली आहे नागरिकांचे शेतीमालासह दैनंदिन गरजेच्या वस्तू देखील उध्वस्त करून टाकले आहेत सर्वत्र पुराचे साम्राज्य दिसून येत आहे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अशावेळी शासनाकडून भरघोस मदतीची अपेक्षा शेतकरी राजा करतो आहे.
परांडा तालुक्यातील वडनेर या ठिकाणी मुसळधार पावसानंतर आलेल्या महापुरामध्ये एकाच कुटुंबातील वयोवृद्ध आजी दोन वर्षाचा मुलगा व इतर दोन व्यक्ती घराच्या छतावर अडकून पडले होते अशावेळी एन डी आर एफ च्या जवानांच्या मदतीने धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या सुटका कार्यामध्ये सहभाग घेतला साधारण सायंकाळी आठ वाजता या चारही जणांची सुखरूप सुटका झाली यातून त्यांचा समाजाविषयीचा जिव्हाळा दिसून येतो खरोखर लोकाभिमुख खासदार असल्याची ही एक पोचपावतीच म्हणावी लागेल.
Screenshot 