लोणी काळभोर-(हवेलीनामा वृत्तसेवा)
लोणी काळभोर पोलिसांचा लोणी तील जुगार अड्ड्यावर छाप्यात १३००/रूपये मुद्देमालासह पाच जण जुगार खेळताना पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील पांढरी रोडवरील कांबळे यांच्या शेतात यम्मी नावाचा जुगार खेळताना
१. लक्ष्मण महादेव शिंदे (वय ३० वर्ष रा तुकाईमाता मंदिर, लोणी काळभोर, पांढरी रोड) २. प्रविण यशवंत काळे (वय ३७ वर्ष रा कन्या प्रशालेजवळ, गणपती चौक, लोणी काळभोर ) ३. अजमुद्दीन शेख, ४. सुनिल काळभोर, ५. गणेश केसकर दरम्यान कांबळे यांचे शेतामध्ये पांढरे मळा येथे सर्व जण स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी एकत्र गोळा होवून रमी पत्ते नावाचा जुगार पैशावर खेळत असताना मिळून आले. सदरवेळी त्यांचेकडून एकुण किं १६००/-रुपये रोख रक्कम व १२० कागदी पत्तेसह मिळुन आले. ही कारवाई लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
