पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे ग्रामीण मधील पौड पोलिस स्टेशन हद्दीतील घोटावडे गावच्या हद्दीत पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकलेल्या मृताची ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणून खून करणाऱ्या आरोपीस पुणे ग्रामीण पोलीसांनी अटक केली असून या प्रकरणी एका रिक्षा चालक सचिन प्रकाश जाधव याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
अनोळखी पुरूषाचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घोटावडे (ता. मुळशी)येथे टाकून देण्यात आला होता. मृतदेह कुजण्यास सुरूवात झालेली होती. मृतदेहाचे गळ्यावर वार व डोक्यात जखमा होत्या अज्ञात व्यक्तीने अनोळखी पुरुषाचा अज्ञात कारणास्तव, धारदार हत्याराने व कशानेतरी वार करून खून करून पुरावा नष्ट करण्याकरीता मृतदेह टाकून दिला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक व पौड पोलीस स्टेशन कडील पथकांनी एकत्रित सुरू केला. घटनास्थळावर आधार कार्ड मिळले आधार कार्डवरील नाव पत्ता बाबत तपास केला असता मृतदेह आशुतोष मनोहर वैशंपायन (वय ४७ वर्षे रा. २६०९, ग्लेन हाईट्स, क्लिफ अव्हेन्यु, हिरानंदानी गार्डन, हेरीटेज गार्डन पवई, मुंबई ७६) यांचा असल्याचा संशय निर्माण झाला, त्याचबरोबर आशुतोष मनोहर वैशंपायन हे पुण्यातील घरी राहणेसाठी एकटेच लखनऊ येथून पुणे येथे दि. ०४/०९/२०२५ रोजी रेल्वेने गेले असल्याचे त्यांची पत्नी अक्षदा वैशंपायन यांनी सांगितले. त्या माहितीचे आधारे तपास पथकांनी पुणे रेल्वे स्टेशन वरील सीसीटीव्ही फुटेज तपासलले कपड्याचे वर्णन जुळून आले असता आधारे त्याचा मागोवा घेत त्यांनी पुणे स्टेशन ते स्वारगेट असा रिक्षाने प्रवास केला, त्यानंतर स्वारगेट परिसरातून ते दुसऱ्या रिक्षाने सिंहगड रोड कडे गेल्याचे निष्पन्न झाले.
गोपनीय बातमीदाराकडून संशयित रिक्षाची व रिक्षा चालक यांची माहिती मिळविली असता, रिक्षा चालक सचिन प्रकाश जाधव (वय ४१ वर्षे रा. केशव कॉम्प्लेक्स लेन नंबर ४ धनकवडी) सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली शोध घेतला असता घरी तपास केला असता तो परागंदा झाला होता संशय बळावला शोध मोहीम सुरु करुन त्याला धनकवडीतून ताब्यात घेतले आशुतोष वैशंपायन हे दारू पिलेले होते, त्यांचे कडील एटीएम कार्डने सचिन जाधव याने त्यांना पैसे काढून दिले, तेव्हा आशुतोष वैशंपायन यांचे खात्यावर लाखो रूपये असल्याचे सचिन जाधव यास समजले. त्या पैशांचे लोभापायी त्याने आशुतोष मनोहर वैशंपायन यांचा खून करून घोटावडे गावचे हद्दीत जावून त्यांचा मृतदेह फेकून दिला असल्याची कबुली आरोपीने दिली.
सचिन जाधव वर जबरी चोरी, चोरी चे पुणे शहरात एकूण १३ गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पौडचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत पासलकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण, योगेश जाधव, नाना शेंडगे, पोलीस अंमलदार तुषार भोईटे, अमोल शेडगे, मंगेश भगत, राजू मोमीण, अतुल डेरे, वैभव सावंत, पौड पो स्टे चे पोलीस अंमलदार नंदू गडाळे, रॉकी देवकाते, दिलीप सुपे, प्रशांत बुनगे, ईश्वर काळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल सुर्यवंशी, आकाश पाटील, संदिप दराडे, बाबा पाटील, सुशांत गायकवाड, श्रीकृष्ण पोरे यांनी केली असून पुढील तपास पौड पोलीस स्टेशन करत आहेत.
