लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील कदमवाकवस्ती येथील संभाजी नगर मधील प्रथमेश अपार्टमेंट मध्ये घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी तब्बल १लाख ६४हजार रुपयांचा सोने चांदीचे दागिने व रोख रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कदमवाकवस्ती येथील संभाजी नगर मधील प्रथमेश अपार्टमेंट मध्ये राहणारे
मंगेश तुकाराम मोहिते, (वय २९ वर्षे धंदा व्यवसाय रा सध्या बिल्डींग प्रथमेश अपार्टमेट, फ्लॅट नं-१०२.१ला मजला, कदमवाक वस्ती)यांचा बंद फ्लॅटच्या लोखंडी दरवाज्याचे कुलुप तोडून आज्ञत चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील लाकडाचे कपाळाचे लॉक तोडून कपाटा मधील लॉकर मधील लॉक उचकटून लॉकर मधील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम यात  ४५,०००/- रुपये किमतीची एक १.५ तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस
 १७,०००/- रु.किंमतीचे एक०६ ग्रॅम वजनाचे सोन्याचेकानातले लॉग टॉप्स,
 २४,००० /- रु. किंमतीचा एक ४ ग्रॅम वजनाची सोन्याचे अंगठी,
 १६,०००/-रु.किंमतीची एक २ ग्रॅम ४० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची पिळयाची अंगठी, १८,०००/- रु. किंमतीची एक ०३ ग्रॅम वजनाची सोन्याची लेडीज अंगठी,
 १०,०००/- रु. किंमतीची सोन्याची लेडीज ०३ नथी ४,०००/-रु.किमतीची एक चांदीचा छल्ला, चांदीच्या पैंजणाची ०१जोड, जोडवीच्या दोन जोडया, गळयातील चांदीची एक चैन, चांदीच्या ०३ अंगठया,
 ३०,०००/-रु. रोख रक्कम असा एकूण १लाख ६४हजार (१,६४,०००/) रुपयांचा मुद्देमाल आज्ञत चोरट्यांनी लंपास केला.याची फिर्याद लोणी काळभोर पोलिस स्टेशन मध्ये  दिलेली आहे घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र पन्हाळे, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक स्मिता पाटील,
सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे, घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक
 योगेश पैठणे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *