पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील रामटेकडी येथे दोन जणांना गांजा विक्री करताना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून अंदाजे ३४हजार रुपये किंमतीचा १किलो सातशे ग्रॅम गांजा जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अंमली पदार्थविरोधी कारवाईचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक व पोलीस अंमलदार महेश गाढवे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया येथील श्रीनाथ फुड कंपनीसमोर, रामटेकडी, हडपसर येथे दोन इसम लाल रंगाच्या सॅगमध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगुन कोणाचीतरी वाट बघत थांबलेले आहेत. मिळलेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन टिम करुन घटनास्थळी धाव घेतली असता दोन इसम लाल सँग घेवुन थांबलेले दिसले त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता ते पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना जागीच पकडले. १) अविनाश श्रीरंग भोंडवे, (वय ४१ वर्षे, रा. चुनाभट्टी, गणेश मळा, देशपांडे गार्डनजवळ, सिंहगड रोड,) २) संजय विश्वनाथ काथे, (वय ३५ वर्षे, रा. गोसावी वस्ती, शिवरकर समाज मंदिराशेजारी, वैदुवाडी, हडपसर) याना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळ असलेल्या लाल रंगाच्या सँगची तपासणी केली असता पांढ-या पिशवीतील एक हिरवट प्लास्टीकचे चिकटटेप लावलेली पिशवी व काही पांढ-या कागदी पाकीटे मिळून आली ती उघडुन पाहता ३४,२४०/-रु. किंमतीचा १ किलो ७३४ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ मिळुन आला.याबाबत वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत महाडिक करीत आहेत
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन विजयकुमार डोके यांच्या सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक सुधीर चौघुले, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, सर्फराज देशमुख, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, यतीन भोसले, विष्णु सुतार, बालाजी वाघमारे, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे व दिपक क्षीरसागर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *