थेऊर: (हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांची गांजा वाहतुक करणाऱ्यावर कारवाई कारवाईत १२किलो गांजा व रिक्षा असा ५लाखाचा मुद्देमाल जप्त करुन एक जणाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थेऊर (ता. हवेली) येथील रेल्वे पुलाच्या खाली असलेल्या रस्त्यावर सकाळच्या दरम्यान एक रिक्षात गांजा असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळली असता पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे थेऊर रेल्वे उड्डाणपूला खाली सापळा लावून रिक्षा पकडली असता रिक्षात २लाख पन्नास हजार रुपये किंमतीचा गोणीत 12 किलो 345 ग्रॅम गांजा सापडला पोलिसांनी या कारवाई रिक्षासह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात लोणी काळभोर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.लक्ष्मण राजू पवार (वय 30, रा. यमुना नगर मनपा हॉस्पीटलच्या मागे, सिध्दार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्किम निगडी) याला अटक करण्यात आली आहे तर रवि आण्णा कुऱ्हाडे ( यमुनानगर सिद्धार्थनगर,ओटा स्किम निगडी), चंद्रकांत सुरेश पवार (वय 28, रा. बोरीऐंदी ता. दौंड) व एक अनोळखी असा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने 12 किलो 345 ग्रॅम गांजा हा चंद्रकांत सुरेश पवार व त्याच्या सोबत मोटारसायकलवरील अनोळखी इसम यांच्याकडून घेऊन विक्रीसाठी चालविला असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. तर उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक मागावर आहे.
ही कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, अण्णा माने, रामहरी वणवे, पोलीस अंमलदार राहुल कर्डिले, प्रवीण धडस, चक्रधर शिरगिरे, सचिन सोनवणे व त्यांच्या पथकाने केली आहे.
