थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) पूर्व हवेलीला पावसाने झोडपले सलग पंधरा सोळा तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थेऊर कुंजीर वाडी आळंदी कोलवडी लोणीत हाहाकार उडाला अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या शेतीसह नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने गैरगरीब नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असून ओढे नाल्यावरील अतिक्रमणामुळे तसेच नैसर्गिक वाहणाऱ्या ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे पुराचे पाणी वाहण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असे नागरिकांनी सांगितले
थेऊर (ता.हवेली) येथील थेऊर नायगाव रोडवर असलेल्या रूकेवस्ती येथील ओढ्याला प्रचंड पुर आल्याने रात्रीच्यावेळी जवळपास पंचवीस तीस घरे पुराच्या पाण्याने वेढली गेली होती येत येथे राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले घरातील भांडी संसार उपयोगी वस्तू पाण्याने वाहून गेला अन्नधान्य इलेक्ट्रॉनिक वस्तू गाड्यांचे नुकसान झाले तेथे राहणारे ताराचंद बोडरे या मेंढपाळाच्या चाळीस पैकी तीस पस्तीस शेळ्या मृत्यूमुखी पडल्या तर महादेव कांबळे यांच्या दोन म्हशी एक गाय पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने या नागरिकांनावर आस्मानी संकट ओढावले असून डोळ्यात देखत होत्याचे नव्हते झाले
थेऊर(ता,हवेली)येथील रुकेवस्तीतून वाहणाऱ्या ओढ्यावर जागोजागी अतिक्रमण झाल्याने या ओढ्याचे पात्र शेतातील पाटा सारखे झाले आहे यातील धक्कादायक बाब म्हणजे रुकेवस्ती येथे ओढ्याचा मूळ प्रवाह बदलला असून त्यावर तेथील शेतकऱ्याने सिमेंट क्राॕकिटचे कुपन तेथील नळ्यांवर मारले असल्यामुळे ओढ्याच्या प्रवाहाला याचा अडथळा निर्माण होऊन ओढ्याच्या बाजूला असणाऱ्या शेतकरी तसेच लोकवस्तीत याचे पाणी घुसून अनेक घरे पाण्यात होती यामध्ये घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पाण्यात वाहून येणाऱ्या सापांमुळे संकटांचा सामना करावा लागत होता.यावेळी बोलताना रविदास कांबळे या स्थानिक रहिवासी यांनी सांगितले की पाणी वाढण्यास रात्री एक वाजता सुरुवात झाली जर ओढ्यावर अतिक्रमण केलेली आर सी सी भिंती पाण्याच्या प्रवाहाने पडली नसती तर आम्ही लोक जीवंत राहिलो नसतो पाण्याला वेग इतका होता की चारचाकी वाहने जाग सोडत होती तर अनेक दुचाकी गुरे शेळ्या वाहन गेल्या पाण्याच्या अति वेगाने संरक्षक भिंती जमीन दोस्त होऊन पाण्याने रस्ता कापत नेला जीव मुठीत धरून आम्ही सर्व सोडून जीव वाचत एकामेकांच्या मदत करत जिल्हा परिषद शाळेचा आसरा घेतला. रूके वस्ती येथील ओढ्यावर अतिक्रमण करुन नैसर्गिक प्रवाहाचा मार्ग बदलून त्याच्याकडेलला बांधलेली सिमेंटच्या भिंतीमुळे आमचे दरवर्षी नुकसान होते त्यामुळे या ओढ्यावर झालेले अतिक्रमण तसेच बदलेला प्रवाह पूर्ववत करावा व अतिक्रमण करणाऱ्या धनदांडग्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील पुर बाधित नागरिकांनी केली आहे.
पुराची महिती मिळताताच रात्री हवेलीच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पीएम आरडीएचे रेस्क्यू टीम थेऊरचे मंडल अधिकारी किशोर जाधव ग्राममहसूल अधिकारी, लोणी काळभोर पोलिस यांनी रात्री घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली व तहसीलदार यांनी तात्काळ नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.सकाळी ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील,ग्रामसेवक यांनी पाहणी केली. चिंचवड देवस्थानच्या वतीने पुर बाधित नागरिकांची भोजन व्यवस्था केली.
