लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसमूह ) जवळपास बारा तास पावसाने झोडल्यानंतर पूर्व हवेलीतील पूर परिस्थिती अत्यंत भयंकर बनली होती पुणे सोलापूर महामार्गास नदीचे रूप आले होते संपूर्ण महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते लोणी काळभोर येथील कदम वाकवस्ती परिसरामध्ये पावसाचे पाणी अक्षरशः महामार्गावरून वाहताना दिसत होते तर घोरपडे वस्ती, इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले यावर शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर यांनी आज त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. कदम वाक वस्ती ग्रामपंचायत परिसरामध्ये साधारणतः शंभर कुटुंब बाधित असून वार्ड क्रमांक दोन वार्ड क्रमांक सहा मधील ही कुटुंबीय आहेत त्यांच्या नास्त्यासह दुपारचे भोजन व संध्याकाळच्या ही भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

निलेश काळभोर यांनी सांगितले की, निसर्गाने केलेल्या या नुकसानीचे महसूल खात्याकडून लवकरात लवकर पंचनामे करून बाधित कुटुंबांना शासनाकडून मदत मिळावी तसेच अशी परिस्थिती निर्माण का होते यावरही या विभागाकडून माहिती घेऊन त्यावर कार्यवाही करण्याची गरज आहे.

लोणी काळभोर प्रमाणेच या महामार्गावरील कुंजीरवाडी थेऊर फाटा या परिसरातही पावसाच्या पाण्याने वाहतूक कोळंबा झाला महामार्गावर पुराचे स्वरूप निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *