वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा ) वाघोली पोलिसांनी व्हॉटसअप व क्रेडिट कार्ड हॅक करुन फ्लिपकार्डवरुन मोबाईल खरेदी करणा-या परराज्यातील सायबर चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील लाखोंचे मोबाईल फोन जप्त केले.
वाघोली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रेडिट कार्ड हॅक करुन १,०६,८८५/-रु. कि.चे मोबाईल फोन फ्लिप कार्डवरुन खरेदी केलेबाबत तक्रारीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना मोबाईल फोनची डिलीव्हरी वाघोली केसनंद रोड, प्रिन्स मेडिकल, वाघोली पुणे येथे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वाघोली येथील फ्लिफकार्ड चे ऑफिसला जावुन गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता मोबाईल फोनची डिलीव्हरी घेणारा इसमाचा फोटो प्राप्त झाला. त्या फोटोचे आधारे वाघोली, केसनंद, बकोरी, खराडी, चंदननगर भागात शोध घेतला असता संशयित इसम हा लेन नंबर ३. काळुबाईनगर, वाघोली येथे राहणाऱ्या अस्लम मोफिद खान (वय २२ वर्षे रा.मु.पो. भिवुर ता. चैनपुर जि. कैमुर बिहार राज्य सध्या रा. लेन नंबर ३, काळुबाईनगर, वाघोली) २) आदिब रिझवान खान (वय २१ वर्षे रा. मु. नौसारी विरावल रोड, एपीएफएम मार्केट, फ्लॅट नंबर १०३, सुरत गुजराज राज्य) यांना वाघोली पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले असता आदिब खान व त्यांचे साथीदार हे क्रेडिड कार्ड हॅक करुन फ्लिफकार्डवरुन मोबाईल खरेदी करीत असुन आरोपी आदिब खान हा सुरत येथुन विमानाने येवुन साथीदार अस्लम खान याचे मदतीने खरेदी केलेले मोबाईलची डिलीव्हरी घेवुन ते सुरत येथे नेवुन त्यांच्या साथीदाराच्या मदतीने ते विक्री करीत असल्याचे निष्पन्न झालेले दाखल गुन्हयातील आरोपी यांच्या कडून १२,००,०००/-रु.किं.चे एकुण ४५ मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहेत.पुढील तास वाघोली पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आसाराम शेटे करीत आहे.
ही कारवाई पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे पोलीस निरीक्षक, गुन्हे आसाराम शेटे, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, सायबर पथकाचे अमंलदार रमेश साबळे, किरण अब्दागीरे, विष्णु सरवदे, सतिश बिरादार व वृंदाविनी चव्हाण यांनी केलेली आहे.
