थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) श्रीक्षेत्र थेऊरमध्ये अनेक मोकाट गोधन फिरताना दिसून येत असून यातील काही गायीना लंपीची लागण झाल्याचे दिसून येत आहे. हा चमडीचा आजार असून यामुळे जनावराच्या त्वचेवर फोडासारखे व्रण येतात कालांतराने यात आळ्या होऊन हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो. या जनावरापासून इतर गुरांना संसर्ग होण्याचा धोका असतो.

सध्या गावात अशी काही मोकळी गुरे दिसून येतात यावर त्वरित औषधोपचार होणे अपेक्षित आहे. यामुळे गोठ्यात असलेल्या गुरांना देखील हा आजार होऊ शकतो. अनेक वेळा शासकीय यंत्रणा वेळकाढूपणा करताना दिसतात. यावर वेळीच उपचार केले गेले नाही तर याचे मानवावर देखील दुष्परिणाम होण्याचा धोका आहे.
पशु संवर्धन विभाग अथवा ग्रामपंचायत प्रशासन यांनी याची वेळेत दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.
