पुणे (हवेलीनामा वृतसमूह) परप्रांतातून अमली पदार्थ युक्त याबा गोळया पुणे शहरात आणून विक्री करणाऱ्यास पुणे पोलिसांनी गजाआड करून त्याच्याकडून एकूण ६,५८,८६०/-रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणी निशान हबीब मंडल, वय ४७ वर्षे, रा. मुळ रा. नं. ९/३ बी आर रेसीडेन्सी सेकन्ड क्रॉस गणेश मंदिरराचे मागे, एन जी आर ले आऊट रुपेन्ना अग्रहरा बैंगलोर राज्य कर्नाटक यांस पोलिसांनी अटक केळी आहे.

मध्ये रात्री उशीरापर्यंत अंमली पदार्थ विक्री तसेच सेवन करण्या-याचा शोध घेवुन त्यावर सशक्त कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त यांचे आदेश होते. फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी प्रशांत भस्मे, यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना महत्वाच्या सुचना व आदेश दिले होते.दि.१६/०७/२०२५ रोजी फरासखाना पोलीस गस्तीवर असतांना पोलीस अमंलदार नितीन तेलंगे व गजानन सोनुने यांना खबर मिळाली की, बँगलोर राज्य कर्नाटक येथील एक व्यक्ती दिनांक १७/०७/२०२५ रोजी अंमली पदार्थ युक्त याबा गोळया विक्रीसाठी रेड अलर्ट एरियामधील कॅसेट गल्ली येथे येणार आहे. तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे यांचे अधिपत्याखाली कारवाई करण्यासाठी एक पथक तयार करून कारवाई करण्यात आली.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त, परि-१ पुणे शहर कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, मसपोनि शितल जाधव, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार कुष्णा निढाळकर, महेबुब मोकाशी, नितीन तेलंगे, तानाजी नांगरे, मोरे, गजानन सोनुने, नितीन जाधव, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, महेश पवार, अकबर कुरणे, शशीकांत ननावरे, सुमित खुट्टे, चेतन होळकर, प्रशांत पालांडे, संदिप लोंढे मनिषा पुकाळे, रेखा राऊत, अर्चना ढवळे, भालेराव, बनसोडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *