पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पोलीस स्टेशन मधील दाखल गुन्ह्यात दोषारोप पत्रात त्रुटी ठेऊन गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी रावेत पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस हवालदार व सहायक फौजदार यांनी सुरुवातीस ५०,०००/- रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३०,०००/- रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न आणि लाचलूचपत खात्याकडून सापळा कारवाईत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी लोकसेवक महिला पोलीस हवालदार श्रीमती राजश्री घोडे यांनी तक्रारदाराकडे तक्रारदाराच्या आशिलाविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात वरील प्रमाणे मदत करण्यासाठी सुरुवातीस ५०,०००/- रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३०,०००/- रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लोकसेवक राकेश पालांडे, सहायक पोलीस फौजदार यांनी लोकसेवक क्रमांक १ श्रीमती. राजश्री घोडे यांच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे.सापळा कारवाईमध्ये लोकसेवक राजश्री घोडे यांनी तक्रारदाराकडून रावेत पोलीस स्टेशनमध्ये ३०,०००/- रुपये लाच घेतली असता त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच लोकसेवक राकेश पालांडे यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्या दोघांविरुद्ध रावेत पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *