थेऊर: (हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांनी दोन अट्टल सोनं साखळी चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून १०ग्रम वजनाचे मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (थेऊर ता.हवेली) येथील संगिता पंडीत बोडके यांचे बोडके वस्ती तारमळा येथे किराणामालाचे दुकान आहे आरोपी हे दुकानात चिक्की घेण्याच्या बहाण्याने गेले व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून गेले या गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपाून कौशल्यपूर्ण तपास करत सचिन अर्जुन ढगे (वय१९ माऊली नगर कात्रज), रोहित राजू माने (वय २५ दत्तमंदिर कात्रज)यांना अटक करुन चोरी गेलेले मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर,सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, कुंभार, गाडे, राहूल कर्डीले, सोनवणे, शिरगिरे, दडस, पाटील, कुदळे, वीर, व महिला पोलिस शिपाई थोरात यांनी केली आहे.
