पुणे (हवेलीनामा वृत्तसेवा) बिल्डरने २२लोकांची फसवणूक करुन ३८गुंठे जमीन दुसऱ्याच विकली त्याचा फेरफार नोंद रद्द करण्यासाठी ४६वर्षाच्या तक्रारदारानला दोन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी मंडल अधिकारीसह खाजगी इसम लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात
तक्रारी केस चालवून तो फेरफार रद्द करण्यासाठी लोकसेवक शिवणे येथील मंडल अधिकारी व खाजगी इसम यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती त्यावर सापळा रचून लोकसेवक मंडल अधिकारी मारुती महादेव चोरमले (वय५३वर्ष शिवणे त्या.मावळ जिल्हा पुणे) व खाजगी इसम जयेश बाळासाहेब बारमुख (वय चादंखेड ता मावळ)यांना दोन लाख रुपये घेताना लाचलूचपत विभागाने रंगेहाथ पकडले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
तक्रारी केस चालवून तो फेरफार रद्द करण्यासाठी लोकसेवक शिवणे येथील मंडल अधिकारी व खाजगी इसम यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती त्यावर सापळा रचून लोकसेवक मंडल अधिकारी मारुती महादेव चोरमले (वय५३वर्ष शिवणे त्या.मावळ जिल्हा पुणे) व खाजगी इसम जयेश बाळासाहेब बारमुख (वय चादंखेड ता मावळ)यांना दोन लाख रुपये घेताना लाचलूचपत विभागाने रंगेहाथ पकडले असून पुढील तपास पोलीस करत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ लोकांनी मिळून सन २०१८ व २०१९ मध्ये बिल्डर पूर्णचंद्र सनातन स्वाईन यांना १ कोटी ९० लाख रुपये देऊन त्याच्याकडून मौजे मावळ कुसगाव येथील गट नंबर २०९ मधील ३८ गुंठ्याचे क्षेत्र विकसन करारनामा करून घेतले आहे. नमूद क्षेत्राचा विकसन करारनामा झाला असताना सुद्धा बिल्डर पूर्णचंद्र सनातन स्वाईन यांनी त्या २२ लोकांची फसवणूक करून ते क्षेत्र दुस-या व्यक्तीला खरेदीखत करून देऊन विकले. त्या ३८ गुंठ्याची खरेदीखत केल्यानंतर त्या व्यक्तीने त्या क्षेत्राची सातबारा उता-यावर नोंद होण्यासाठी संबंधित तलाठ्याकडे अर्ज दाखल केला. त्या अर्जावर संबंधित तलाठ्याने त्या व्यक्तीचा फेरफार नोंद करून तो फेरफार मंजुरीसाठी लोकसेवक क्र. १ श्री मारुती चोरमले, मंडल अधिकारी यांच्याकडे पाठवला, त्यावेळी तक्रारदाराची बहीण व इतर २१ लोकांनी तो फेरफार मंजूर न होण्यासाठी हरकत घेतली. त्याप्रमाणे लोकसेवक क्र.१ श्री. मारुती चोरमले यांनी हरकतीच्या अर्जावर सुनावणी चालू केली. त्यादरम्यान तक्रारदाराची बहीण व इतर २१ लोकांनी तक्रारदाराला अधिकारपत्र देऊन त्यांच्या नावे पॉवर ऑफ अॅटर्नी लिहून दिली. त्याप्रमाणे तक्रारदार हे लोकसेवक क्र. चोरमले यांच्याकडे दाखल हरकतीच्या प्रत्येक सुनावणीच्या वेळी हजर राहू लागले.
नवीन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी तसेच ते ३८ गुंठ्ठयाचे वादग्रस्त क्षेत्र तक्रारदाराची बहीण व इतर २१ लोकांच्या नावावर होण्यास मदत करण्यासाठी यातील लोकसेवक क्र. १ श्री. मारुती चोरमले यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून पुढील कामासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा खाजगी इसम जयेश बारमुख यास भेटण्यास सांगितले असता त्याने सुद्धा तक्रारदाराकडे मंडल अधिकारी मारुती चोरमले यांच्यासाठी २ लाख रुपये व त्याच्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. या अनुषंगाने सापळा रचला असता
दोघांनीही तक्रारदाराकडे त्यांच्याकडे कामासाठी २ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदाराकडून पंचासमक्ष २,००,००० (दोन लाख) रुपये ऍकॉर्ड हास्पीटलच्या समोर, स्वाईन रोड, भोसरी, पुणे येथे स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. तसेच खाजगी इसम क्र. २ श्री. जयेश बारमुख यांनी स्वतः करीता तक्रारदाराकडून १०,०००/- रुपये फोन पे द्वारे पंचासमक्ष स्वीकारले आहेत. त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून. त्यांचेविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानचे पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी केली.
