थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील वाडे बोलाई परिसरामध्ये हातभट्टीवर गुन्हे शाखेने कारवाई करत तब्बल तीन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हे शाखा यूनिट ६ चे पोलीस अधिकारी वअंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना ऋषिकेश ताकवणे यांना माहिती मिळाली की, लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत वाडे बोलाई, माळवाडी, ज्ञानेश्वर पवार यांच्या क्षेत्रातील ओढ्यालगत हेमंत राजपूत, रा. बुद्ध विहार, वाडेगाव गावठाण, वाडे बोलाई हा भट्टी लावून दारू काढत आहे अशी बातमी मिळाल्याने तेथे छापा घातला असता दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व तयार हातभट्टी दारू, दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व तयार दारू चे कॅन इत्यादी साहित्य हस्तगत केले.यात 1) 02,45,000 /- रुपये हातभट्टी दारु तयार करण्याचे कच्चे रसायन 5000 लिटर 35 रुपये प्रति लिटर.

2) 70,000/रुपये एकूण 35 लिटर मापाचे प्लास्टिकचे 20 कॅन मध्ये असणारी एकूण 700 लिटर गावठी हातभट्टी तयार दारू प्रत्येकी 100 रुपये लिटर प्रमाणे असा एकूण 3,15000/- रुपये किमतीचा माल जप्त केला.

 

ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट 6चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा पोलीस निरीक्षक राकेश कदम व मदन कांबळे, पोलीस हवालदार सारंग दळे, निलेश साळवे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, सुहास तांबेकर यांचे पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *