यवत-( हवेलीनामा वृत्तसेवा) भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा छडा लावण्यात यवत पोलिसांना यश पाच आरोपींना घेतले ताब्यात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७जून रोजी यवत पोलिस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी एक अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे यास धारदार अज्ञात हत्याराने हल्ला करून संपुर्ण डोक्यावरती, उजवे छातीवर, पाठीवर, वार करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने ज्वालाग्राही पदार्थ मयताच्या शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवुन जीवे ठार मारले होते याबाबत पोलिस हवालदार विनायक हाके यांनी सरकारतर्फ अज्ञात आरोपीविरुध्द यवत पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.या घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे आधारे विश्लेषण करून तसेच इतर जिल्ह्यातील दाखल मानव मिसिंगची तपासणी सुरू असताना ढोकी पोलीस स्टेशन, जिल्हा धाराशिव येथील मानव मिसिंग दाखल होती मिसिंग मधील लखन किसनराव सलगर (वय २४ वर्ष, रा. टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव) हा सदर गुन्ह्यातील अनोळखी मयत इसम असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता इसम नामे १) योगेश दादा पडळकर (वय २५ वर्षे), २) राजश्री योगेश पडळकर( वय २३ वर्ष दोघे रा. माळशिरस ता. पुरंदर) ३) विकास आश्रुबा कोरडे (वय २१ वर्ष रा. आनंदवाडी टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव) ४) शुभम उमेश वाघमोडे( वय २२ वर्षे, रा. मुरुड ता. जि. लातूर) ५) काकासाहेब कालिदास मोटे (वय ४२ वर्ष ग. येवती ता. जि. धाराशिव) यांनी संगनमताने कट रचून लखन किसनराव सलगर यास तीव्र धारदार अज्ञात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपुर्ण डोक्यावरती, उजवे छातीवर, पाठीवर, वार करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवुन जीवे ठार मारले असल्याचे कबुल केले आहे. गुन्हयातील निष्पन्न झालेल्या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व यवत पोलीसांनी ताब्यात घेतले असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलिस करत आहेत
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिराजदार,उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल गावडे, महेश माने, प्रविण संपांग, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, सहाय्यक पोलीस फौजदार सचिन घाडगे, मोमीन शेख, अजित भुजबळ, अजय घुले,धिरज जाधव, संदीप देवकर, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, विकास कापरे, दत्ता काळे, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, नारायण वलेकर, गणेश कर्चे, सुनिल नगरे, विनायक हाके, संतोष कदम, प्रमोद गायकवाड, परशुराम म्हस्के, प्रमोद शिंदे, वैभव भापकर, मारूती बाराते, विनोद काळे, दिपक वेताळ, प्रणव ननवरे, प्रतिक गरूड, शुभम मुळे, सचिन काळे,मोहन भागवंसे, स्वप्नाली टिळवे यांच्या पथकाने केली.
