पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा)उमदी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत तांब्याच्या तारा  चोरणारा चोरट्याला केले गजाआड.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
उमदी पोलिस स्टेशन हद्दीतील  सनमडी (ता.जत जिल्हा सांगली) गावच्या हद्दीतील विनवाईड कंपनीच्या पवनचक्कीच्या खांबाला असलेले कुलूप तोडून त्यामधील १३५ फुट लांबीची १,४१,०००/- रुपये किमतीची ताब्यांची तार चोरीला गेली होती.
याबाबत सुरक्षारक्षक अमित सोपान म्हारनूर (वय ३१ वर्षे  रा.सनमडी ता.जत जि. सांगली) यांनी फिर्याद दिली होती. याबाबत
उमदी पोलीसांना तपासाची चक्रे फिरवली असतानाच गुप्त बातमीदारां कडुन माहिती  मिळाली की  परिसरात मध्ये संशयीतरित्या एक इसम कुंडलापूर ता.कवठेमहांकाळ येथे   फिरत असल्याचे माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे उमदी पोलीसांनी अनिल भिमराव पवार(रा.कुंडलापूर ता.कवठेमहांकाळ जिल्हा सांगली) यास कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने कसुन, कौशल्याने तपास केला असता तांब्याची तार चोरून नेली असल्याचे कबुल केले. १,४१,०००/- किंमतीची चोरून नेलेली तांब्याची तार व ५०,०००/-किंमतीची एक हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटार सायकल काळे रंगाची एम एच १० सीके ३५६५ असा एकुण १,९१,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्याची उकल अवघ्या १० तासात करण्यात उमदी पोलीसांना यश आले आहे. सदर आरोपी विरुध्द यापुर्वी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे,अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलिस अधिकारीसुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे,पोलिस उपनिरीक्षक धसाडे, पोलिस शिपाई कोळी,संतोष माने,ढाले, यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धसाडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *