थेऊर:(हवेलीनामा वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस आबासाहेब काळे यांनी एक आगळावेगळा व गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी निगडित समस्या विषयी शिबिर आयोजित केले असून त्यांच्या या उपक्रमाचे जेष्ठ नागरिकांनी कौतुक केले आहे
थेऊर(ता.हवेली) येथील वृंदावन मंगल कार्यालयात आरोग्य महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रत्येक आजारांवरील तज्ञ डॉक्टरांचे पथक तपासणी करून मौफत औषध उपचार करण्यात येणार असून तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनही पेशंटला मिळणार असल्याची माहिती आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी दिली असून परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच जेष्ठ नागरिक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे हे शिबिर थेऊर येथील वृंदावन मंगल कार्यालयात २ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती काळे यांनी दिली. या शिबिरात नाक कान घसा हृदयरोग डोळ्यांचे आजार पोटाचे विकार महिलांच्या आरोग्य विषयी समस्या तसेच दंत उपचार,दिव्यांगाना मोफत जयपूर फुट व लहान मुलांना विषयी आजार व त्यावर मोफत उपचार अशा विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांचे तपासणी करून मौफत औषध उपचार करण्यात येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना कार्ड,मोफत जनरल औषध उपचार सुविधा शासकीय योजनांचा लाभ तसेच अन्न धान्य वितरण विभाग( रेशनकार्ड दुरुस्ती सुविधा) अशा आरोग्य विषयक सर्व निदान शिबिराचे एकाच छताखाली औषध उपचार व तज्ञ डॉक्टरांचे पथक मार्गदर्शन लाभणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी याचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहिती साठी पैलवान दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालय काळे कॉम्प्लेक्स चिंतामणी गणपती मंदिराजवळ थेऊर येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.
