थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा यांच्या माध्यमातून जे के एस पी समर्पण फाउंडेशन च्या वतीने नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 290 विद्यार्थ्यांना 2700 वह्या तसेच मार्गवस्ती येथील शाळेतील 53 विद्यार्थ्यांना 400  वह्याचे वाटप  शांताबाई ओमप्रकाश पोकर्णा आणि प्रकाशजी बोरा यांचे हस्ते करण्यात आले. मागील वर्षी त्यांच्या वतीने स्कूल बॅग व छत्री वाटप करण्यात आले होते. चारित्र्य चुडामणी बा. ब्र. प. पूज्य गुरुदेव श्री 1008 जीवराज जी मा. सा. हे पोकर्णा कुटुंबीयांचे गुरु असून त्यांची जन्मभूमी नायगाव आहे . गुरूंचे जन्मभूमी मध्ये गावचा विकास करण्याचा संकल्प पोकर्णा  कुटुंबीयांनी केलेला असून मागील वर्षीपासून शालेय विद्यार्थ्यांना अशा प्रकारची मदत करत आहेत. पोकर्णा यांनी शासनाकडे पाठपुरावा करून सार्वजनिक सभागृहासाठी 50 लाख रुपयांचा निधी मिळवून दिला असून ते काम पूर्णत्वास येत आहे. गावच्या सर्व विकास कामासाठी त्याची मदत होत आहे.

या कार्यक्रमास सरपंच कल्याणी संदीप हगवणे, माजी सरपंच अश्विनी  योगेश चौधरी, राजेंद्र चौधरी, उत्तम शेलार, पोपट चौधरी, उत्तम घुले, मुख्याध्यापक संजय पवार, अमित लोणकर , सर्व शिक्षक वृंद, शिक्षण समिती सदस्य, पालक विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *