लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसमूह ) संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणी काळभोर नगरी सज्ज झाली आहे.लोणी काळभोर आणि कदम वाकवस्ती ग्रामपंचायत प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी सोहळा स्वागतासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती कदम वाकवस्तीचे पालखी नियोजन प्रमुख चित्तरंजन गायकवाड, उपसरपंच नासिरखान पठाण,ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांनी दिली.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहू वरून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर पुणे शहरातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर पुणे सोलापूर महामार्गवरून पुढे मार्गस्थ होतो शहरानंतरचा उपनगरातील हा पहिला मुक्काम कदम वाकवस्ती येथील पालखी तळावर आहे. रविवार दिनांक 22 रोजी पालखी येथे मुक्कामासाठी दाखल होत आहे.लाखो वारकऱ्यांसाठी लोणी काळभोरसह कदम वाकवस्तीची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी बैठक घेऊन योग्य नियोजन केले आहे.पुणे शहर आयुक्तालय पोलीस दल व लोणी काळभोर पोलीस यंत्रणेकडून पोलिस बंदोबस्ताची चोख व्यवस्था केली आहे

पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक चौफुला येथून वळविण्यात आली आहे.न्हावरा मार्गे नगर मार्गे पुणे अशी तर पुण्याच्या दिशेने सोलापूर जाणाऱ्या वाहनासाठी मुंढवा रोडने नगर रोड कडून चौफुलामार्गे सोलापूर ला असे वाहतुकीचे नियोजन शहर वाहतूक विभाग यांनी केले. कवडी पाट पासून महामार्गावर पालखी सोहळ्यासाठी अप्पर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलीस निरीक्षक ,पोलीस कर्मचारी , होमगार्ड , एसआरपीएफ प्लाटून पथक , पोलीस मित्र असे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी शहर पोलीस विभागाकडून नियोजन करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली

आरोग्य विभागाकडून पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग व लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कवडी पाट, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडीसह सोरतापवाडी, उरुळी कांचन परिसरातील हॉटेल, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण विहिरी , बोरवेल , पाण्याचे स्रोत पाण्याचे साठे यांची तपासणी करून पाण्याच्या नमुना चाचणी केली आहे. तर पालखी मार्गावर आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागाचे तिन टप्पे केली असून आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका ,आशा आरोग्य सहाय्यक ,आरोग्य अधिकारी , आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यवस्था केली आहे वारकऱ्यांसाठी दोन खाजगी रुग्णालयात खास व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे विश्वराज रुग्णालय,शिवम रुग्णालयात अतिदक्षता विभाग राखीव ठेवले आहेत तर कार्डीऑक रुग्णवाहिका सेवेत असणार आहे मोफत औषध किट अशी व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे व डाॅ डी जे जाधव यांनी दिली

कदम वाकवस्ती व लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी दिवाबत्ती ,आवश्यक त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात आले आहेत तसेच वारकरी मंडळीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली असून जागोजागी शौचालय त्यासाठी लागणारे पाण्याची व्यवस्था असे नियोजन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यामातून पालखी सोहळ्यात हागणदारीमुक्त सोहळा पार पाडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून त्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी शौचालय बोर्ड , पाण्यासाठी बोरवेलची व्यवस्था उपलब्ध केली आहे तसेच उघड्यावर घाण होवू नये साठी ग्रामपंचायत पथक वारकरी मंडळीना सहकार्य करून शौचालयाचा वापर करण्यासाठी मदत करणार असून वारकऱ्यांसाठी तातडीच्या सेवेसाठी जागोजागी मार्गदर्शक फलक त्यामध्ये आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन ,ग्रामपंचायत विभाग , रुग्णवाहिका यांचे फोन नंबर लावण्यात येणार असून तसेच स्वच्छता मोहीम याचे फलक लावण्यात आले आहेत तसेच वारकरी मंडळीच्या व दिंड्याच्या मुक्कामासाठी तसेच पावसामुळे काही अडचण येऊ नये म्हणून गावातील सर्व शाळा , सर्व मंदीरे , समाजमंदिर वारकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत व सर्वांची स्वच्छता करण्यात आली आहे.

 

कदम वाकवस्ती येथील पालखी तळावर भव्य मंडप, कोणत्याही सुविधाची कमतरता होऊ नये तसेच गेली 15 दिवस नियोजनासाठी तळ ठोकून बसून यावर्षी देखणा सोहळा व्हावा म्हणून हवेलीचे उप विभागीय महसूल अधिकारी यशवंत माने, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सर्व प्रशाकीय यंत्रणा सह चोख नियोजन केले आहे

 

जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त निर्मलवारीचे अयोजन..

आषाढीवारी निमित्त सेवासहयोगच्या वतीने पोर्टेबल टाॅयलेटची सुरवात 2015 साली प्रथमच लोणीकाळभोर येथुन माजी खासदार प्रदीपदादा रावत,पंढरपूर देवस्थान कमेटी सदस्य शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. 2015 साली 300 शौचालय प्रायोगिक तत्वावर लावण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने निर्मलवारीची दखल घेऊन 2016 साली 300 व 2017 साली 300 शौचालयाची व्यवस्था केली होती. यावर्षी शासनाकडून 1200 शौचालयाची सोय करण्यात आली आहे.यामुळे गावातील अस्वच्छता दिसणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *