कुंजीरवाडी (हवेलीनामा वृत्तसेवा) शैक्षणिक वर्ष 2025ची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली जिल्हा परिषद शाळांमध्ये नवागतांचे  प्रवेशोत्सव शालेय पाठय पुस्तके गणवेश देत औक्षण करून स्वागत करण्यात आले कुंजीरवाडी जिल्हा परिषद शाळांमध्ये नवागतांचे स्वागत फुले फुगे देऊन करण्यात आले.यावेळी शालेय शिक्षण कमिटी पालक शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.उन्हाळी सुट्ट्या संपून मुलांच्या शाळा सुरु झाल्या कुंजीरवाडी गांव जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना चॉकलेट, पाठ्यपुस्तके , गणेवश,व फुल देऊन मुलांचे स्वागत केले आपली शाळा मराठी शाळा नारा यावेळी देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना नेते स्वप्नील कुंजीर  होते यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष नाना कुंजीर जेष्ठ नागरिक संघ सचिव बबन कुंजीर मुख्याध्यापक गोरक्षनाथ ओगले भाऊ जाधव राहुल हेंद्रे ठकुबाई कुंजीर प्रकाश चौधरी बाप्पू डाके सह मान्यवर पालक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी  स्वप्नील कुंजीर यांनी  पालकाना आव्हान केले की आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम ला घालून पैसे वाया घालु नका जिल्हा परिषद शाळेचा पर्याय निवडा मराठी शाळेत चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळते त्यामुळे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मराठी शाळाच योग्य असून मुलांची बौद्धिक क्षमता वाढीसाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मराठी शाळांनी वेळोवेळी आपले अस्तित्व सिद्ध केले असून अलीकडेच्या काळात इंग्रजी शाळा व मराठी शाळा मध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली असून यात मराठी शाळा अव्वल ठरल्या आहेत आणि दिवसेंदिवस पालकांचा ओढा मराठी शाळेकडे वाढत आहे ही आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन कुंजीर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *