थेऊर: (हवेलीनामा वृत्तसेवा) राज्यातील शाळा १६जून पासून सुरू झाल्या असून २०२५शैक्षणिक वर्षास सुरुवात झाल्याने पालकांची धावपळ सुरू असल्यानचे चित्र पहावयास मिळत होते आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रथम वर्ष शालेय प्रवेशाचा कार्यक्रम थेऊर(ता.हवेली) येथील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.मुलाना शालेय गणवेश पुस्तके वाटप करण्यात आले.नव्याने प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांना पुष्प आणि फुगे देऊन औक्षण करून स्वागत करण्यात आले पहिलीत तसेच अंगणवाडीत प्रवेश घेणारे विद्यार्थी या स्वागताने भारावून गेले. असाच आगळावेगळा उपक्रम राबवणारी शाळा असा नावलौकिक असणाऱ्या थेऊर (ता.हवेली)येथील तारमळा शाळेत माझी शाळा माझा स्वाभिमान उपक्रमा अंतर्गत आज प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेमध्ये मुलानी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे ग्रामीण भागातील जीवन शैलीचे दळणवळणचे सर्व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी अशी वेशभूषा करुन स्टॉल मांडले होते. येत्या आठ दिवसात आषाढी वारी सुरू होणार असल्यामुळे पारंपारिक दिंडीही काढण्यात आली होती या वेळेस बाल चम्मूंनी विठ्ठल रुक्मिणी, वारकरी, टाळकरी, विणेकरी, झेंडेकरी, वासुदेव वेशभूषा साकारली शाळेमध्ये दिंडी काढून स्वागत तसेच नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे फुगे व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी नवीन विद्यार्थीही भारावून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.मुलांचे औक्षण करुन फुलांची उधळण करण्यात आली शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या प्रसंगी उपस्थित होते.थेऊर गावठाण जिल्हा परिषद शाळा, चिंतामणी विद्या मंदिर तसेच गावातील सर्व अंगणवाडी शिक्षकांनी पहिलीत तसेच अंगणवाडीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन औक्षण करून विध्यार्थीचे स्वागत केले यावेळी पोलीस पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य शाळेतील सर्व शिक्षक पालक उपस्थित होते.
