थेऊर -(हवेलीनामा वृत्तसेवा)
थेऊर व परिसरातील ब्लड कॅन्सर रुग्णांसाठी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन धावपळीच्या युगात दगदग आणि माणसाच्या राहणीमान आहार झालेले बदल यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. समाजात आज आपण पाहिले तर ब्लड कॅन्सरचे प्रमाण खूप झपाट्याने वाढत आहे. काही कुटुंबामध्ये तसेच नात्यांमध्ये हल्ली कॅन्सरचे रुग्ण पहावयास मिळत आहेत. याचअनुषंगाने आज युवराज हिरामण काकडे यांच्या माध्यमातून व दात्री संस्था, पुणे यांच्या सौजन्याने, ब्लड कॅन्सर असलेल्या रुग्णाला योग्य दाता (Donar) मिळवून देण्यासाठी थेऊर व परिसरात जनजागृती म्हणून सदर शिबिराचे आयोजन केले होते. तरी सदर शिबिराच्या माध्यमातून आपण दाता (डोनर) शोधून त्यांची नाव नोंदणी (REGISTRATION) व swab कलेक्शन करून भविष्यात कोणालाही ब्लड कँसर झाल्यास या मोहिमेच्या माध्यमातून आपण त्यांना मॅच होणारा दाता (matching donar) त्वरित उपलब्ध करून त्यांना जीवनदान मिळणे सोपे होणार आहे.
थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज हिरामण काकडे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून थेऊर व परिसरातील १०० पेक्षा जास्त नागरीकांनी या शिबिरामध्ये आपली नावनोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवीला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांच्यासह दात्री संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
