वाघोली (हवेलीनामा वृत्तसेवा) वाघोली गाव पुणे महानगर पालिकेत समाविष्ट झाल्यापासून महानगर पालिकेवर प्रशासक राज आहे यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे कचरा,पाणी,रस्ते, ड्रेनेज लाईन, सकल भागात पाण्याची ढकली,लाईटची समस्या अशा असंख्य अडचणीला नागरिकांना सामोरे जावे लागते होते यामुळे नागरिक पुरते वैतागून गेले होते
यामुळेच जनसेवक म्हणून अनिल सातव हे नाव आता चर्चेत आले आहे प्रत्येक समस्येचे तात्काळ सोडवणूक करुन नागरिकांना दिलासा मिळत आहे. महापालिकेच्या प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदत घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करुन नागरिकांच्या समस्या दूर करतात त्यांची जनतेची कामे करण्याची पद्धत पाहून नागरिक त्यांना सोशल मिडिया फोनच्या माध्यमातून आपली समस्या सांगत असून त्यावर तात्काळ मार्ग निघत आहे त्यामुळे वाघोली परिसरात आता जनसेवक म्हणून अनिल सातव यांचे नाव पुढे येत आहे त्यामुळे समस्या अनेक त्यावर उपाय एक जनसेवक अनिल सातव अशी चर्चा वाघोली परिसरात सुरू आहे. शिरुर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहून या कामात महानगर पालिकेचे अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर मदत होत असून नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या प्रश्नांनाची सोडवणूक करण्यास कायमच प्राधान्य देणार असल्याचे आनिल सातव यांनी सांगितले.
