थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पत्नी सौ.लताताई शिंदे यांनी, श्रीक्षेत्र थेऊर येथे श्री.चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते गणपती मंदिरात आरती करण्यात आली. यानंतर सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. थेऊर येथे सुरू असलेल्या, विविध विकासकामांची सौ. शिंदे यांनी महिती घेतली तसेच यापुढेही थेऊरसह अष्टविनायक गणपतींना सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचे सुतोवाच केले.
सौ. शिंदे या अष्टविनायक देव दर्शनासाठी निघाल्या आहेत. आज सकाळी अकरा वाजता त्या थेऊर येथे पोहोचल्या. राज्यात मुख्यमंत्री लडकी बहीण योजना सुरु करणाऱ्या माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती थेऊर येथे येणार असल्यामुळे महिलामध्ये देखील उत्साह दिसून येत होता.
यावेळी थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे,लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, PMRDA अधिकारी शितल देशपांडे, सुभाष मोरे, थेऊर मंडल अधिकारी किशोर जाधव,गाव कामगार तलाठी सरला पाटील,ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम पाटील, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे,पुणे जिल्हा शिवसेना संघटक निलेश काळभोर, काळूराम कांबळे, भरत कुंजीर, राहुल कांबळे, सुखराज कुंजीर, गोविंद तारू, मयुर कुंजीर, विनोद माळी, गणेश कुंजीर, गणेश चव्हाण, रामचंद्र बोडके व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
थेऊर येथील बचत गटाच्या महिलांनी, सौ. शिंदे यांचे औक्षण करून, लाडक्या बहिणींचा सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त केले. थेऊर येथील दर्शनानंतर त्या रांजणगावकडे रवाना झाल्या.
