पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे येथील प्राईड आयकॉन खराडी मुंढवा रोड ०९ व्या मजल्यावर मैग्नेटेल बीपीएस अँड कन्सल्टंस एलएलपी हे अनाधिकृत कॉल सेंटरवर पुणे सायबर सेलने छापा टाकून पाच जण ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकुण १३,७४,०००/- रु कि मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरीकांना त्यांच्या अॅमेझॉन खात्याचा गैरवापर झाला असुन त्यातुन ड्रग्जची तस्करी झाल्याचे सांगुन त्यांना डिजीटल अटकेची भिती दाखवुन त्यांची फसवणुक करण्याकरीता बोगसकॉल सेंटर चालविले जात असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने वरिष्ठांच्या पुर्व परवानगीने सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर व गुन्हे शाखा, पुणे कडील पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी तात्काळ मध्यरात्री छापा टाकला हे कॉल सेंटर विनापरवाना चालवत असुन तेथे अनधिकृत कॉल सेंटर चालु असल्याचे निदर्शनास आले.

त्या ठिकाणी १) सरजितसिंग गिरावत सिंग शेखावत, सध्या रा. खराडी, पुणे मुळ रा. झुंझुना, राजस्थान २) अभिषेक अजयकुमार पांडे, सध्या रा. खराडी, पुणे मुळ रा. अहमदाबाद, गुजरात ३) श्रीमय परेश शहा, सध्या राखराडी, पुणे मुळ रा अहमदाबाद, गुजरात, ४) लक्ष्मण अमरसिंग शेखावत, सध्या राखराडी, पुणे मुळ रा. अहमदाबाद, गुजरात, ५) अॅरोन अरुमन खिश्चन, सध्या राखराडी, पुणे मुळ रा अहमदाबाद गुजरात हे सायंकाळी ०६.०० वा ते पहाटे ०२.०० वा पर्यत अमेरिकन वेळेनुसार कॉल सेंटर चालवत असुन कॉल सेंटरमध्ये १११ पुरुष व १२ महिला कामकरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांचेकडील लॅपटॉपची पाहणी केली असता तेथे संशयास्पद अॅप्लीकेशनचा, व्हिपीएन सॉफ्टवेअर चा वापर करुन कॉलर माईकव्दारे अमेरिकन नागरीकांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्ककरुन अॅमेझॉन अकाउंटचा बेकायदेशिर वापर होत असुन त्यामधुन ड्रग तस्करी केली जात असुन तेथील नागरिकांना डिजीटल अरेस्टची मिती दाखवुन त्यांना गिफ्ट कार्ड विकत घेण्यास भाग पाडुन ते गिफ्ट कार्ड स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले. याकरीता त्यांचेकडे अमेरिकन नागरिकांच्या मोबाईल क्रमांकाचा लाखोंच्या सख्येतील डेटा लॅपटॉपमध्ये सापडला.

अनधिकृत कॉल सेंटरमध्ये ९,६०,०००/- रु किं. एकुण ६४ लॅपटॉप, ४,१०,०००/- रु किंएकुण ४१ मोबाईल फोन, तसेच ४००० रु किं एकुण ०४ राउटर, कॉल सेंटरमध्ये काम करणा-या कर्मचा-यांची ओळखपत्र तसेच अमेरिकन नागरीकांना फसवणुक करण्यासाठी कर्मचा-यांना दिलेली इंग्रजीमधील संवादाची स्क्रिप्टची कागदपत्रे, इ. असा एकुण १३,७४,०००/- रु कि मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

 

या टोळीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर सायबर गुन्हे करण्याचे कनेक्शन तपासात निष्पन्न झाले असुन गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असुन गुन्ह्यात यु.एस डॉलर ची फसवणुक रक्कम भारतीय बँकांचा वापर करुन हवाला किंवा क्रिप्टो करन्सी मार्फत फिरवतात किंवा त्याची मोठ्या प्रमाणात आफरा तफरकरीत आहेत याबाबत तपास पथक गुन्ह्याचा तांत्रिक व क्लिष्ट सखोल तपास करीत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार, मा.पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त (आर्थिक व सायबर), विवेक मासाळ सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, सायबर पो. ठाणे, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक, तुषार भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे, पोलीस उपनिरीक्षक राम दळवी, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार कैलास चव्हाण, सहा. पोलीस फौजदार अविनाश इंगळे, पोलीस अंमलदार होले, वाघमारे, विजय पवार, बाळासाहेब सकटे, निलेश जाधव, हरीष मोरे, पोलीस अंमलदार विशाल इथापे, देविदास वांढरे, अमित जमदाडे, पो. अमंलदार ऋषिकेश व्यवहारे, निखीलजाधव, महिला पोलीस अंमलदार सीमा सुडीत, स्मिता हंबीर, जान्हवी मडेकर, पोलीस अंमलदार संदीप पवार, मांढरे, दिनेश मरकड, सचिन शिंदे, प्रविण रजपुत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *