थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) श्री क्षेत्र थेऊर (ता.हवेली) येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्ताने भीम फेस्टिवलचे आयोजन हवेली तालुका आरपीआयचे अध्यक्ष मारुती कांबळे आणि मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यात मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस उपायुक्त राजेंद्र मोकाशी यांच्या हस्ते भीम फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले यात रोहिणी दादा बहुले यांनी मानाची पैठणी व एल एडी टीव्ही मिळवून त्या भीम फेस्होटिवल 2025च्या होम मिनिस्टर विजेत्या मिनिस्टर ठरल्या.सनिया तुषार सावंत यांनी दुसरा क्रमांक मिळवला तृतीय क्रमांक सोनाली रमेश गायकवाड तर सारिका विश्वजीत कांबळे यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला भीम फेस्टिवलचे सलग तीन दिवस आयोजन करुन यात भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले

पहिल्या दिवशी गावातील महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला यात गावातील महिलांची प्रचंड गर्दी झाली होती यावेळी अनेक महिला भगिनींनी यात सहभाग घेतला या कार्यक्रमात अनेक बक्षिसांसे ठेवण्यात आली होती प्रथम क्रमांक साठी उद्योगपती गणेश चव्हाण यांच्या वतीने एल एडी टीव्ही व ग्रामपंचायत सदस्य गौतमी मारुती कांबळे यांच्या वतीने मानाची पैठणी देण्यात आली द्वितीय क्रमांकसाठी गॅस सिलिंडर चे कनेक्शन थेऊर मधील युवा उद्योजक विलास सोनवणे यांच्या वतीने ठेवण्यात आले.तृतीय क्रमांकासाठी युवा उद्योजक निखिल काकडे यांनी कुलर देण्यात आला चतुर्थ क्रमांकासाठी युवा नेते तक्षक कांबळे यांच्या वतीने मिक्सर देण्यात आला. सादरकर्ते आनंद खुडे होम मिनिस्टर  कार्यक्रमात महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती.
या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या महिला तसेच लक्की ड्रा मधून निवडलेल्या महिला भगिनींना छत्रपती सेवा संघाच्या वतीने आकर्षक भेटवस्तू छत्रपती सेवा संघाचे अध्यक्ष सागर राजगुरू यांच्या हस्ते देण्यात आली. दुसऱ्या दिवशी वैशाली सोनवणे यांच्या गायन पार्टीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला तिसऱ्या दिवशी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली यात विविध प्रकारच्या भारतीय चालीरितीचे दर्शन घडविणारे पारंपारिक खेळांचे सादरीकरण करून फटाक्यांची आतिषबाजी करून ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक मारुती दादा कांबळे युवा मंचाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *