थेऊर (हवेलीनामा वृतसमूह)

कस्तुरी मळवट चंदनाची उटी!

रुळे माळकंठी वैजयंती !!

श्रीक्षेत्र थेऊर श्री चिंतामणी गणपतीस वासंतिक चंदन उटी मोगरा महोत्सव आणि वारकरी भजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.यात समस्त थेऊर ग्रामस्थ, गावातील सर्व वारकरी भजनी मंडळी आणि आगलावे पुजारी यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.या कार्यक्रमाला पूर्व हवेली वारकरी संप्रदायाच्या श्रीक्षेत्र थेऊर, कोलवडी, कुंजीरवाडी, नायगाव, पेठ, सोरतापवाडी, उरुळी कांचन, म्हतोबाची आळंदी, लोणी काळभोर, कदम वाकवस्ती, केसनंद, कोंढवा,येवलेवाडी पेरणे, फुलगाव, गोलेगाव, कोरेगाव भीमा, शेवाळवाडी, डोंगरगाव, मांजरी खुर्द, आव्हाळवाडी, वाघोली, शिंदवणे, भेकराई, फुरसुंगी, कोरेगावमुळ गावाकडून वारकरी मंडळी भजन सेवा करण्यासाठी आली. संघटनात्मक व्यासपीठ व विचारमंच तयार व्हावा अखंडत्व आणि वारकरी संप्रदायाची भगवंताचे संतांचे नामस्मरण व्हावे हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून ही सेवा संपन्न करण्यात आली. गावातील सर्व मंदिरातील मूर्ती यांना चंदन उटी लावून पूजा करुन सायंकाळच्या वेळी ला गणपती बाप्पांना चंदन उटी मोगरा आरस आणि वारकरी संप्रदायाची भजन सेवा झाली सामुदायिक आरती करुन आलेल्या सर्व वारकऱ्यांचा सत्कार आणि भोजनप्रसाद करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *