थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पुणे सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी हद्दीत थेऊर फाटा येथे दोन दिवसापूर्वी पहाटेच्या वेळी अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळतात पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर पोलीस हवालदार विजय जाधव,पोलीस शिपाई प्रशांत सुतार यांनी घटनास्थळी जाऊन जखमी व्यक्तीला खाजगी रुग्णवाहिकेत घालून लोणी काळभोर येथील रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासणी केली असता तो मृत असल्याचे सांगितल्यावर त्यानंतर तो मृतदेह वानवडी येथील ए एफ एम सी रुग्णालयात शवागृहात पाठविण्यात आला. पोलीस हवालदार विजय जाधव यांनी अपघाता संदर्भात तक्रार नोंदवली.त्या मृत व्यक्तीकडील पिशवीत दोन लाख 39 हजार रुपये सापडले ते पोलीस स्टेशन मधील तिजोरीत जमा करण्यात आले आहेत.

गेली वीस वर्षापासून घर सोडून बाहेर पडलेल्या त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना शोधून काढणे अतिशय अवघड होते परंतु पोलीस हवालदार चंद्रकांत माने यांनी मृत व्यक्ती जवळ असलेल्या मोबाईल वरून तांत्रिक माहिती गोळा केली. वेगवेगळ्या समाज माध्यमावर फोटो पाठवून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. यासाठी थेऊर पोलीस चौकीचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार यांनी मोबाईल वरील तांत्रिक माहिती काढून शोध चालू ठेवला.त्यावर आज दि. 23 मे रोजी सकाळी संबंधित नातेवाईक थेऊर पोलीस चौकीत आले. त्यांना त्या मृत व्यक्ती संदर्भात माहिती विचारली असता त्यांचे नावं पांडुरंग ज्ञानबा राऊत असल्याचे सांगितले. फोटोवरून ओळख झाल्यावर नातेवाईकांना कमांड रुग्णालयात घेऊन मृत व्यक्तीची ओळख घेण्यात आली त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पांडुरंग राऊत घराकडे फिरकलेच नसल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

मृत पावलेल्या व्यक्तीने गेल्या वीस पंचवीस वर्षात घराकडे दुर्लक्ष केले होते राऊत यांना तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे ही व्यक्ती घराबाहेर असताना त्याच्या पत्नीने आपल्या माहेरच्या मंडळींबरोबर राहून तीन मुलींचे लग्न केले त्या लग्नालाही ही व्यक्ती उपस्थित राहिली नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

ही कामगिरी लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार पोलीस हवालदार विजय जाधव, चंद्रकांत माने, पोलीस शिपाई प्रशांत सुतार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *