थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी येथील बारा फाटा या ठिकाणी लोणी काळभोर पोलीस तसेच गुन्हे शाखा युनिट सहा यांनी संयुक्तिक कार्यवाही करून रोख रक्कम व आठ वाहने असा सुमारे अठरा लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कुंजीरवाडी येथील बारा फाटा या ठिकाणी पैशावर मटका जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.या माहितीच्या आधारे त्याठिकाणी राजेंद्र पन्हाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहीद पठाण पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, युनिट ०६ तसेच लोणीकाळभोर पोलीस व गुन्हे शाखा युनिट ०६ कडील पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तिक सापळा रचुन छापा टाकला.या कारवाई दरम्यान १) सोमनाथ महादेव घोडके वय ३४ वर्षे रा. सोरतापवाडी, ता. हवेली जि. पुणे २) ज्ञानेश्वर देविदास कांबळे वय ३० वर्षे रा. वैदवाडी, हडपसर पूणे ३) नितीन राजेंद्र शिंदे वय ३७ वर्षे रा. राजीव गांधी चौक लातुर ४) आकाश देविदास कुंजीर वय २७ वर्षे रा. कुंजीरवाडी ता. हवेली जि. पुणे ५) राहुल बारीकराव थोरात वय ३१ वर्षे रा. उरुळीकांचन ता. हवेली जि. पुणे यांना ताब्यात घेण्यात आले असुन १) सागर गाढवे रा. बेटवस्ती, लोणीकाळभोर २) जुगल किशोर लढढा रा. लातुर ३) भाउ खलसे रा. कुंजीरवाडी हे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.त्या ठिकाणाहून जुगाराचे साहीत्य, रोख रक्कम, व आठ वाहने असा एकुण १७,९७,८६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, निखील पिंगळे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०५. डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा युनिट ०२ राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ०६, वाहीद पठाण, पोलीस उप निरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार शिंदे, नागलोत, पोलीस शिपाई कुदळे, कुंभार सर्व नेमणुक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पोहवा तांबेकर, पोहवा निंभोरे, पोशि काटे, सर्व नेमणुक गुन्हे शाखा युनिट ०६ पुणे शहर यांनी केली आहे.

 

           अवैध धंद्यावरील या कारवाई मुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *