थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर व परिसरामध्ये बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाका आवाज काढत फिरणाऱ्या टवाळखोरांवर अखेर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला हवेली नामा मधून यासंदर्भात वृत्त प्रकाशित होताच कार्यवाहीला वेग आला, थेऊर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार पोलीस हवालदार चंद्रकांत माने,पोलीस शिपाई अडके ताम्हाणे मयूर बोरावके यांनी रात्री साडे दहा नंतर उशिरापर्यंत कार्यवाही करून चार बुलेट वर कारवाई केली.यात त्यांचेकडून सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून थेऊर परिसरामध्ये संध्याकाळी उशिरा व रात्री दहा अकरा नंतर देखील बुलेटच्या सायलेन्सर मधून जोरजोरात फटाका आवाज काढत टवाळकी करणाऱ्या बुलेट्स वर कारवाई होण्यासंदर्भात हवेलीनामात बातमी प्रसिद्ध झाली कारण लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन चा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक अवैध धंद्यांसह टवाळखोरांनावर देखील कारवाई करण्यात आली.

परंतु गेल्या आठ दहा दिवसापासून पुन्हा बुलेट आवाज सुरु झाले त्यावर हवेलीनामातून काल वृत्त प्रकाशित झाल्यावर रात्री दहा ते साडे अकरा या दरम्यान थेऊरफाटा ते थेऊर गाव दरम्यान कारवाई करून चार बुलेट चे सायलेंसर तपासणी करून त्यात फेरबदल केलेला आढळून आला त्यानुसार वाहतूक शाखेकडून त्यावर दंडात्मक कारवाई केली.

लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले की यापुढेही अशा प्रकारची प्रभावी कार्यवाही केली जाणार आहे आपल्या दुचाकी वाहनांमध्ये केलेले फेरबदल त्वरित काढून टाकावेत अन्यथा दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागेल.

बुलेटवरील कारवाई बरोबरच डी जे च्या आवाजावर नियंत्रण येईल का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. धडाकेबाज अधिकाऱ्याकडून यावर देखील कारवाई होण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *