पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लग्न समारंभ असो वा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम अलीकडे डी जे चा अवास्तव आवाज वाढला असून शहर पोलीस याकडे डोळेझाक का करते आहे हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे.
मंगल कार्यालयांसमोर तसेच गावातून मिरवणूक काहीही असो धडकी भरवणारा डी जे चा आवाज येतोच याला वेळेचे अथवा ठिकाणाचे काही घेणे नाही. कर्णकर्कष्य आवाजामुळे लहान मुले, जेष्ठ नागरिक आजारी रुग्ण यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कानठाळ्या बसवणाऱ्या आवाजाचा तेथे उपस्थित असलेल्यांना देखील त्रास सहन करावा लागतो.
पूर्व हवेली मधील लोणी काळभोर, कदम वाकवास्ती,थेऊर, कोलवडी, कुंजीरवाडी, केसनंद, वाघोली, ही गावे ग्रामीण पोलीस दलात असताना पूर्णपणे डी जे बंदी करण्यात आली होती परंतु हा परिसर शहर पोलिसात समाविष्ट झाल्यावर यात हळूहळू बदल होत गेला आणि अलीकडे तर यात मोठी वाढ झाली आहे रात्री उशिरा पर्यंत हा धिंगाणा चालू असतो.
पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी यात लक्ष घालून सर्वसामान्य नागरिकांची अडचण दूर करावी अशी मागणी होत आहे.
