थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत व पाकिस्तान दरम्यान झालेल्या सैनिकी कारवाईत शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना अभिवादन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हवेली तालुका तसेच छत्रपती सेवा संघ आणि थेऊर ग्रामस्थ यांच्या वतीने नरवीर उमाजी नाईक समाज मंदिरापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला.

एप्रिल 22,2025 रोजी काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करत 26 जणांची हत्या केली यावर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आणि दहशतवाद्यांना ठेचून काढण्याचा सूर देशातून उमटू लागला देशातील नागरिकांच्या भावनेचा भारत सरकारने विचार करत दहशतवाद्यांना जमिनीत गाढून टाकण्याची रणनीती आखली. आणि भारताने पाकिस्तानामध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर अण्वस्त्र डागली यामुळे पाकिस्तानचे नाचक्की झाली या हल्ल्यात जवळपास 100 अतिरेकी मारले गेले अतिरेक्यांचे प्रशिक्षण केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली यावर चौताळलेल्या पाकिस्तानने भारतातील सामान्य नागरिक तसेच सैनिकी स्थळावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला याला भारतीय सैनिकांनी सडेतोड उत्तर देत एकही हल्ला होऊ दिला नाही उलट भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या सैनिकी ठिकाणांना लक्ष केले अनेक एअर बेस उध्वस्त करून टाकले त्यानंतर पाकिस्तानने युद्ध विरामाची भाषा केली यावरून पाकिस्तानी लष्कराने गुडघे टेकले हे सिद्ध होते.

या सैनिकी कार्यवाही दरम्यान भारतीय जवान देखील शहीद झाले या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रिपब्लिकन पार्टीचे हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे तसेच छत्रपती सेवा संघाचे अध्यक्ष सागर राजगुरू, ग्रामपंचायत सदस्य संतोष काकडे, तसेच यशवंत बोराळे,मोहन कुंजीर, योगेश काकडे,निखिल काकडे,नितीन कुंजीर,पोलीस पाटील रेश्मा कांबळे,पोलीस मित्र संतोष गायकवाड, राहुल गायकवाड आदी तरुण या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते यावेळी शहिदांना श्रद्धांजली वाहून भारत माता की जय वंदे मातरम वीर जवान अमर रहे अशा घोषना देण्यात आल्या.

थेऊर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार दिगंबर जगताप,विशाल बनकर,संतोष बारगजे आणि अनिल कदम यानी कँडलमार्च वेळी बंदोबस्त ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *