थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) गेल्या आठ दहा दिवसापासून तीर्थक्षेत्र थेऊर मध्ये बुलेटच्या कर्णकर्कश्य आवाजाने नागरिक हैराण झाले तसेच रात्री दहा नंतर फटाक्याचे होणारे आवाज नागरिकांच्या झोपेस अडथळा निर्माण करत आहेत.
लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील कर्णकर्कष्य फटाका आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करत अनेकांच्या गाड्यांचे सायलेन्सर काढून त्यावर मोठी कारवाई केली त्यानंतर काही कालावधी शांत गेला, थेऊर पोलीस चौकी हद्दीमध्ये पोलीस हवालदार विजय जाधव तसेच प्रशांत सुतार यांनी ताबडतोब कार्यवाही करून अनेक बुलेट्स वर कारवाया केल्या परिणामी गावात बुलेटची आवाज बंद झाले आणि सर्वत्र शांतता निर्माण झाली . परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून थेऊर गावातील रस्त्यावरून बुलेट्स मधून बार काढण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे अशी परिस्थिती दिसून येत आहे याला नेमके कारण काय कोण कमी पडते हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे पोलिसांकडून स्वयंस्फूर्त कार्यवाही होणे आवश्यक असताना ती का होत नाही.
तसेच रात्री 11:30 च्या नंतर सुद्धा बऱ्याच वेळेला मोठ्या आवाजाचे फटाके लावण्यात येतात यावर देखील पोलिसांकडून कार्यवाहीची अपेक्षा आहे कारण अपरात्री फटाक्याच्या आवाजामुळे लहान मुले दचकून झोपेतून जागी होतात त्यामुळे ती घाबरून जातात अशावेळी फटाके लावण्यासाठी काही विशिष्ट नियमावली लावून देण्याची आवश्यकता आहे.
आठवडे बाजारातून मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली असून मोबाईल चोरांना अटकाव करण्यात पोलिसांना आतापर्यंत यश आलेले दिसत नाही अशा अनेक केसेस पोलिसांमध्ये दाखल असून गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून अशा प्रकारचे गुन्हे उघड झाल्याची माहिती मिळालेली नाही यात सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक हानी होत असताना यावर लोणी काळभोर पोलीस स्टेशन काय पावले उचलते हे पाहणे गरजेचे आहे.
