पुणे:(हवेलीनामा वृत्तसेवा) राष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेची सर्वसाधारण सभा प्रलंबित असल्यामुळे तसेच राज्य धोरण या राष्ट्रीय धोरणावर अवलंबून असल्यामुळे, राज्यातील तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सॉफ्टबॉल खेळाडूंना त्यांच्या कर्तृत्व असूनही आवश्यक लाभ मिळत नाहीत. या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे राज्याचे सरचिटणीस दत्तात्रय उर्फ आबा काळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रितीश चौधरी, अॅड. बी.एम. चौधरी तसेच सॉफ्टबॉलचे प्रशिक्षक तसेच खेळाडूंचे शिष्टमंडळ घेऊन राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी भरणे यांनी खेळाडूंना येणाऱ्या समस्या अडीअडचणी यामधून सकारात्मक मार्ग काढण्यासाठी चर्चा करुन सर्व मागण्या  समजून घेऊन तातडीने सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन देऊन  पुढील आठवड्यात सॉफ्टबॉल संघ प्रतिनिधी आणि क्रीडा विभागाचे सचिव व OSD यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले त्यामुळे सॉफ्टबॉल खेळाडूंमध्ये समाधानचे वातावरण असून गेली अनेक वर्षांपासूनच्या मागण्या मार्गी लागणार असल्यामुळे आबा काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नाचे खेळाडूंनी कौतुक केले आहे.
महायुतीचे सरकार राज्यात खेळाडूंच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना राबवत आहे आगामी काळात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडू हे ऑलम्पिक मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतील त्यासाठी लागेल ती मदत सरकारच्या माध्यमातून खेळाडूंना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
दत्तात्रय उर्फ आबा काळे
(सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *