थेऊर  (हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांची अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करत तब्बल 2लाख35हजार ( २,३५,०००/- ) रुपयांचा चा मुद्देमाल हस्तगत करुन एकाला ताब्यात घेतला.
            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  दुपारच्या सुमारास थेऊर फाट्याकडून कोलवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिंतामणी विद्या मंदिराजवळ एक इसम त्याच्या कडील  हुन्डाई कंपनीच्या आय. ट्वेंटी कारमधुन हातभट्टी दारुचे कॅन वाहुन नेत असल्याची बातमी थेऊर पोलीस चौकी येथील पोलीस हवालदार विशाल बनकर यांना प्राप्त झाली.  बातमीच्या अनुषंगाने बातमीची खातरजमा करण्यासाठी सापळा रचला असता ती कार आढळून आली असता चौकशी केल्यावर चारचाकी गाडीचा चालक  सोमनाथ दयानंद शेटप्पा( वय ३० वर्षे रा. पाषाणकर बाग रोड, लोणी काळभोर,) हा  गाडीमध्ये हातभट्टी गावठी दारु भरलेली एकुण १० प्लास्टीक कॅन आढळून आले त्यात३५० लीटर हातभट्टी दारु मिळुन आल्याने ती पोलीसांनी जप्त केली. सोमनाथ दयानंद शेटप्पा यास लोणी काळभोर पोलीसांनी ताब्यात घेऊन तब्बल  २,३५,०००/- रुपये किंमतीचा माल जप्त हस्तगत केला.
ही कामगीरी पोलिस उप आयुक्त डॉ.राजकुमार शिंदे,  सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या  मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार, पोलिस हवालदार विशाल बनकर, संतोष बारगजे, दिगंबर जगताप, सागर कदम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *