थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) फेब्रुवारी महिन्यात वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील जैन वेअर हाऊस व रिमश्री कॉपर इंडिया प्रा.लि लोहगाव रोड वाघोली येथील गोडावुन फोडुन 25 लाख रुपये किमतीच्या ताब्यांचे तारा व ताब्यांचे स्क्रॅप चोरीस गेले होते. वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकाने या चोरीचा छडा लावून तीन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.

वाघोली पोलीस स्टेशन तपास पथकाने यात एकुण १७२ सी.सी.टी.व्ही ची पाहणी करुन तसेच तांत्रिक विश्लेषणच्या आधार घेऊन मुंबई येथून गुन्ह्यातील ०३ सराईत १) राजेंद्र मोतीचंद जैन वय-५२ वर्षे रा.२७०, रे रोड, मानकेश्वर बिल्डींग, बॅरीस्टर, मुंबई नंबर १० (दुकान पत्ता). सध्या रा.३०३ बी-विंग, राजेंद्र मोतीचंद जैन मुंबई १०, सैफी पार्क. (२) विनोद श्रीपाल जैन, वय-४० वर्षे, व्यवसाय, रा. कामाठीपुरा गल्ली नं.०५ बिल्डींग नं.१११, शंकर पापुला एस.पी. रोड मुंबई. सध्या रा. रुम नं.०६, आत्मारामबिल्डींग, ठाकुर द्वार रोड, गिरगाव मुंबई ०२ (३) सोहेल फिरोज शेख, वय-२२ वर्षे, रा. दारुखाना कोळसा बंद, गणेश हॉटेलजवळ, रे रोड मुंबई यांचे कडुन ६ लाख ४० हजार रु किंमतीचे ताब्यांचे तारा व गुन्हा करण्यासाठी वापरलेला १८ लाख रुपये किं. चा आयशर टेम्पो एकुण २४,४०,०००/-रु किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परी. ४, पुणे हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शना खाली वाघोली पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे पोलीस उप निरीक्षक वैजीनाथ केदार, पोलीस अंमलदार प्रदिप मोटे, प्रशांत कर्णवर, दिपक कोकरे, विशाल गायकवाड, महादेव कुंभार, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, प्रितम वाघ, समीर भोरडे, मंगेश जाधव, अमोल गायकवाड यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *