लोणी काळभोर –(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर येथील महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे पुणे ग्रामीण मंडळ सचिव व सहकारी पतसंस्था पुणे संचालक सचिन मखर यांनी त्यांच्या  वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून उरुळी देवाची येथील नवजीवन बाल निकेतन बहुउद्देशीय संस्था या अनाथ आश्रमात लहान मुलांना सोबत सचिन मखर यांनी साजरा केला.
   वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून आश्रम शाळेतील चिमुकल्यांना दैनंदिन वापरात लागणारी शालेय वस्तू, कपडे, अशा वस्तूरुपी मदत करुन एक कौतुकास्पद उपक्रम राबवून समाजात एक आदर्श निर्माण केला त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना मखर यांनी सांगितले की समाजात सामाजिक क्षेत्रात काम करताना समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो  आपण आपल्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे ही काळाची गरज असून त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य दिसत त्याच आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि समाधान लाभते.येथून पुढेही असाच उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमर बुवांनी भोसले सचिन मखर यांचे आभार मानले व त्यांना अभीष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व विध्यार्थी व मागासवर्गीय विद्युत संघटनेचे पदाधिकारी तसेच त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *