लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा)
लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील कोयता गॅग फिरोज शेख यांचे टोळीवर लोणीकाळभोर पोलीसांनी केली मोक्का अंतर्गत कारवाई.
लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील
 इंदिरानगर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) फिर्यादी विनोद साहेबराव झेंडे घरासमोर  कुटुंबा सोबत संध्याकाळी बसले असता  जुन्या भांडणाच्या कारणावरून गुंड फिरोज शेख, प्रसाद जेठिथोर तसेच त्यांच्या सोबत आस्लम शेख हे तिघे हातात कोयते घेवुन इतर तीन अनोळखी इसम यांनी हातात लाकडी दांडके घेवुन फिरोज शेख याने फिर्यादी यांचेकडे बघुन पकडा या मादरचोदला आज खल्लासच करुन टाकु अशी धमकी देत सर्वजण फिर्यादी यांचे दिशेने येवु लागल्याने बाहेर बसलेले सर्वजण घरात पळुन जावुन घराचा दरवाजा बंद करुन  विनोंद झेंडे व बाळु निकाळजे असे घराचे बाल्कणीत गेले त्यावेळी  गुंडानी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर लोखंडी कायत्याने तसेच लाकडी दांडक्याने मारुन दरवाजाचे व घराचे बाजुचे रिक्षावर लोखंडी कोयते मारुन पुढील बाजुची काच फोडुन बाबा पान शॉपचे शटरवर लोखंडी कोयत्याने मारुन पान शॉपचे नुकसान करुन तेथे जमलेल्या लोकांचे दिशेने धावुन गेल्याने लोक सैरावैरा पळुन गेले व घराचे आजु बाजुचे लोकांनी आपापल्या घरात जावून घराचे दरवाजे बंद करुन घेतले. त्यानंतर ते सर्वजन लाल रंगाची कारमध्ये बसुन त्या ठिकाणाहुन निघुन गेले.
 फिरोज महंमद शेख (वय २९ वर्ष रा. घोरपडे वस्ती कदमवाकवस्ती ता. हवेली), प्रसाद दत्तात्रय जेठीथोर( वय २० वर्षे, रा. माळीमळा लोणीकाळभोर), अस्लम अन्वर शेख (वय २५ वर्षे, रा. जयहिंदनगर झोपडपट्टी, लोणीस्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली), आदित्य प्रल्हाद काळाणे  (कदमवाकवस्ती, ता. हवेली) व विधीसंघर्षित बालक यांनी केलेला असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे तसेच दरम्यानच्या कालावधी मध्ये या टोळीने खुनाचा प्रयत्न, गैरकायदयाची मंडळी जमवुन दहशत करणे, घातक शस्त्राचा वापर करुन मारहाण करुन गंभीर जखमी करणे, बेकायदेशीररीत्या हत्यार जवळ बाळगणे, दहशत पसरविणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल असून अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी आर्थीक उपलब्धीचे उद्देशाने तसेच टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांचे टोळीची दहशत व नागरिकांच्या मनात भिती निर्माण करण्याचे उद्देशाने टोळी तयार केल्याचे गुन्हयाचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयातील टोळीप्रमुख फिरोज शेख व त्याचे इतर ५ साथीदार यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.या गुन्हयातील आरोपीनी संघटीतरित्या अनेक गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उप-आयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त,यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, सर्जेराव बोबडे, पोलीस हवालदार तेज भोसले, प्रशांत नरसाळे, मंगेश नानापुरे, संदिप धुमाळ, किशोर कुलकर्णी, मल्हार ढमढेरे, योगिता भोसुरे, यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने लोणीकाळभोर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात गुंड व टोळी गुन्हेगार यांचे गुन्हेगारी कारवायांवर वचक बसविण्याच्या दृष्टीने मोक्का, एमपीडीए व तडीपार यासारख्या प्रतिबंधात्मक कारवायाचे सत्र सुरू केले आहे मागील चार महिन्यांपासून मोक्का अंतर्गत तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *