थेऊर (हवेलीनामावृतसमूह) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुकेवस्ती ( थेऊर ) ता हवेली जि पुणे येथील उपशिक्षक पदावर कार्यरत असलेले संजय निवृत्ती आगलावे यांना पंचायत समिती हवेली ( शिक्षण विभाग ) हवेली तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार सन 2024-25 सालचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
संजय आगलावे यांनी सन 2001 पासून एक वस्तीशाळा शिक्षक म्हणून नोकरीची सुरवात केली . १४ वर्ष केवळ १००० रुपये मानधनावर शिक्षक म्हणून सेवा करत राहिले कधीही न थांबता पगाराचा विचार न करता ज्ञानदानाचे पवित्र काम करत राहिले त्याचीच पावती म्हणून सन 2014 पासून राज्य शासनाने त्यांना नियमित शासकीय म्हणून पदस्थापना दिली . आज नोकरीच्या 25 व्या वर्षी त्यांच्या कार्याची दखल घेवून पंचायत समिती हवेली ( शिक्षण विभाग ) हवेली तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार सन 2024-25 प्राप्त झाला व त्यांच्या कामाचे सार्थक झाले तरी थेऊर गावाचे सुपुत्र संजय आगलावे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल मुख्याध्यापक शाळा रुकेवस्ती , शाळा व्यवस्थापन समिती रुकेवस्ती , समस्त थेऊर गावातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक वृंद , सरपंच , उपसरपंच तथा सर्व सदस्य ग्रामपंचायत थेऊर , थेऊर गावातील सहकारी मित्र यांचेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या .
