वाडेबोल्हाई. (हवेलीनामा वृत्तसेवा)

वाडेबोल्हाई  (ता. हवेली)  या केंद्र शाळेतील गोविंद माधव केंद्रे यांना यावर्षीचा हवेली तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला
वाडेबोल्हाई केंद्र शाळेतील पदवीधर शिक्षक  गोविंद माधव केंद्रे यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची, विद्यार्थी गुणवत्ता वाढ, शिष्यवृत्ती परीक्षा जिल्हा गुणवत्ता यादीत शाळेने मिळवलेले यश, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे योगदान इत्यादी कार्याचे दखल घेऊन वर्ष 2024 यावर्षीचा हवेली तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार व आदर्श शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार या दोन्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती  काळोखे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी  ज्ञानदेव खोसे, सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख आदी अधिकारी उपस्थित होते.
गोविंद केंद्रे यांच्या कार्यामुळे शाळेचा गुणगौरव, गावाचा नावलौकिक केल्याबद्दल श्रीक्षेत्र वाडे बोल्हाई ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच  वैशाली चंद्रकांत केसवड, उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  रवींद्र अंकुश भोर, उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, तसेच माजी आदर्श सरपंच  कुशाभाऊ गावडे, माजी उपसरपंच  संजय तात्या भोरडे, माजी पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे, माजी उपसरपंच  संजय पायगुडे, शाळेचे मुख्याध्यापक  संदीप गोसावी व सर्व शिक्षक वृंद व पालक यांनी अभिनंदनपर शुभेच्छा देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. व समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *