थेऊर (हवेलीनामा वृतसमूह ) थेऊर मधील दत्तनगर काकडे वस्ती परिसरात एक हृदय द्रावक घटना घडल्याचे समोर येत असून एका महिलेने आपल्या दोन लहान बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत असून त्या महिलेने त्यानंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी ही माहिती समोर येत आहे या घटनेची माहिती कळताच लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेची माहिती घेत आहेत.

ही महिला आपल्या माहेरी बाळंतपणासाठी आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून तिने आपले दोन्हीही जुळी मुले पाण्याच्या टाकीत बुडवली व त्यानंतर स्वतःही त्या टाकीत उडी मारल्याची माहिती पुढे आली आहे याची माहिती घरातील मंडळींना कळल्यानंतर ते गच्चीवर जाऊन त्यांनी त्या महिलेस पाण्यातून बाहेर काढले व त्या दोन्ही बाळांना पाण्याच्या बाहेर काढले तोपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले व पुढील कार्यवाही चालू असल्याची माहिती समोर येत आहे.पोलिसांनी दोन्ही लहानग्यांना शव विच्छेदणासाठी पाठवले आहे.

जन्मदात्या आईने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले, आपल्या पुढच्या दोन बाळांना निर्घृणपणे का मारले हे आणखीन समजले नाही लवकरच याची माहिती समोर येईल.

घटना स्थळी पोलीस उपायुक्त अनुराधा उदामले यांनी भेट दिली आहे.

 

 

सविस्तर माहिती लवकरच 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *