पुणे  (हवेलीनामा ऑनलाइन)  मुळशी तालुका राष्ट्रवादी काॕग्रेसच्या वतीने आगामी जिल्हा परिषेद व पंचायत समिती निवडणूक आढावा घेण्यासाठी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात  उद्योग नगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या मांरुजी येथील जाणता राजा युवा मंच आणि मांरुजीच्या माजी सरपंच पुनम समिर बुचडे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील अगळावेळा उपक्रम राबवण्यात आला समाज सेवेसाठी कायम अग्रेसर असणाऱ्या मांरुजीच्या माजी सरपंच सतत काहीना काही उपक्रम हाती घेत असतात त्यांच्या या संकल्पनेचे कौतुक बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.याचाच एक भाग म्हणजे दि २८ सप्टेंबर  रोजी  मोफत अपघाती विमा योजनेचा शुभारंभ संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना बुचडे यांनी सांगितले की, अपघाती विमा योजनेचा लाभ हिंजवडी पंचायत समिती गणातील मारुंजी,हिंजवडी,जाबे, नेरे, दत्तवाडी आणि कासारसाई येथील शिक्षण घेत असलेल्या मुलींच्या पालकांचा मोफत विमा काढला जाणार आहे या मध्ये अपघात किंवा काही दुखापत झाली तर सदर योजनेतून त्यांना उपचारासाठी फायदा मिळेल हा त्यामागील उद्देश आहे यावेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, तालुका युवक अध्यक्ष निलेश पाडाळे, भोर विधानसभा अध्यक्ष सुनिल चांदेरे, भोर वेल्हा मुळशी युवा नेते सुरेश हुलावळे,राष्ट्रवादी युवकचे हिंजवडी माण गटाचे अध्यक्ष समीर बुचडे    तसेच राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *