राजगुरूनगर (हवेलीनामा ऑनलाइन)  भारतीय जनता पार्टी खेड तालुका व बजरंग दल खेड प्रखंड याच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतीदिन व पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले.
      चांडोली (ता.खेड) येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी व्यासपिठावर जिल्हा सहकार्यवाह बाळासाहेब लोहकरे, बंजरग दल पुणे विभाग संयोजक संदेश भेगडे,  भाजप खेड तालुका उपाध्यक्ष किशोर कुमठेकर, संदीप साबळे, दशरथ चौरे, संदीप डोळस, अक्षय पऱ्हाड, महेश कोरडे, रूपेश ताये, सतीश सावंत, गणेश उबरे उपस्थित होते.
             यावेळी बोलताना किशोर कुमठेकर म्हणाले , पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी सामाजिक आर्थिक चिंतन मांडले.  ज्यांना रहायला घर नाही अंगावर कपडे नाही, खायला अन्न नाही अशा दरिद्री नारायणाला परमेश्वर मानून त्यांची निरंतर सेवा करत जा. ज्या दिवशी तो सन्मानाने जगणार आहे त्या दिवशी आपले काम संपले, तोपर्यंत काम निरंतर करावेच लागेल. दीनदयाळ उपाध्याय हे १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.
      अंत्योदय दिवस भारतात प्रतीवर्षी  दीनदयाल उपाध्याय यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गरीबांच्या उत्थानासाठी देशात सर्व अंत्योदय योजना चालू आहेत, असेही ते म्हणाले.
     याप्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली हुतात्मा नाग्या कातकरी व दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमांचे कार्यक्रमापूर्वी पूजन करण्यात आले. व उपस्थित कातकरी आदिवासी बांधवांना अन्नप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *