लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाइन) बरेच महिने नागरिकांची मागणी असलेला सायकर वस्तीचा  बहुचर्चित रस्ता,,बऱ्याच अडचणीवर मात करुन लोणी ग्रामपंचायत,लोणी काळभोर देवस्थान ट्रस्ट व महात्मा फुले ट्रस्ट या सर्वांचे सहकार्याने या रस्त्याचे कॉक्रेटीकरण करून आज लोकार्पण करण्यात आले.
          या रस्त्याचे उदघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले, हा रस्ता बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता, या वॉर्ड च्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या ललिता राजेंद्र काळभोर यांनी लोणी काळभोर ग्रामपंचायत , लोणी काळभोर देवस्थान ट्रस्ट व महात्मा फुले ट्रस्ट या सर्वांचे सहकार्य घेउन या रस्त्याचे कॉक्रेटीकरण करण्यात आले व आज या रस्त्याचा लोकार्पण सोहळा  पार पडला
 या वेळी मा.जि. प.सदस्य विलास काळभोर, पंचायत समिती सदस्य सनी काळभोर, लोणी काळभोर सरपंच राजाराम काळभोर उपसरपंच ज्योती अमित काळभोर,साधना बँकेचे संचालक सुभाष काळभोर,मा.महापौर नाना ढोले पाटील मा.उपसरपंच राजेंद्र काळभोर, आण्णा गणपत काळभोर,
ग्रा.प.सदस्य योगेश काळभोर,नागेश काळभोर,गणेश कांबळे,युवराज काळभोर,अमित काळभोर, गीताराम लांडगे, मनोज गायकवाड, उमेश राखपसरे,संजय राखपसरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *