राजगुरूनगर (हवेलीनामा ऑनलाइन) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजीत केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दोन कोटी ९६ लाख रुपयांची शासकीय वसुली झाली. तसेच ७ हजार आठशे ४४ खटले निकाली निघाले.
लोकन्यायालयात एकुण ३९०३ खटले तडजोडीसाठी ठेवले होते. त्यापैकी ४११ खटल्यांत तडजोड होवुन एकुण १ कोटी ८७ लाख ५४ हजार,६७०रुपये इतक्या रकमेच्या तडजोडी झाल्या. तसेच दाखल पुर्व १२७५१ इतके खटले ठेवले होते. त्यापैकी ७४५१ खटल्यांत १ कोटी ८ लाख ८५ हजार ४५४ इतक्या रकमेची वसुली झाली.
या लोकन्यायालयाचे उद्घाटन राजगुरूनगर न्यायालयातील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम.अंबाळकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.देवीदास युवराज शिंदे खजिनदार अॅङ माणिक वायाळ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी राजगुरूनगर न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कष्यप . एस. एन. पाटील दिवाणी न्यायाधीश एस. एस. पाखले, के. एच. पाटील, जी. बी. देशमुख., दिवाणी न्यायाधीश आर. डी. पतंगे, डी. बी. पतंगे, पी. ए. जगदाळे. एन.एस. कदम उपस्थित होते.
यावेळी वकिल सभासद व पक्षकार हजर होते. लोकन्यायालयात पॅनल अॅड. म्हणुन अॅड. दिपक चाैधरी, अॅड. विजय रेटवडे, अॅड. रमेश गोकुळे, अॅड. संतोष माळी, अॅड. स्मिता शिंदे, अॅड. रोहिणी करंडे, अॅड. सारिका उमाप, अॅड. सरिता काजळे यांनी काम पाहिले.
किरकोळ कारणांवरून होणारी भांडणे व त्यामुळे अनेक वर्षे कोर्टात प्रलंबित राहिलेने दोन्ही पक्षकारांना अर्थिक व मानसिक नुकसान होते. त्यामुळे सर्वांनी एक पाऊल पुढे टाकल्यास सर्व वाद सामोपचाराने मिटुन पक्षकारांचा होणारा खर्च तसेच मानसिक त्रास कमी होवुन कोर्टातील खटल्यांची संख्या कमी होवुुन प्रत्येकास लवकर न्याय मिळेल. असे यावेळी अॅड. देवीदास शिंदे यांनी सांगितले. असा कोणताही वाद अथवा प्रश्न नाही तो चर्चेने त्याची सोडवणुक होवु शकत नाही. पक्षकारांनी त्यांची इच्छाशक्ती दाखवल्यास कोणताही वाद हा आपआपसात समजुतीने मिटु शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त पक्षकारांनी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले वाद एकत्र बसुन, चर्चा करून लोक न्यायालयाचे माध्यमातुन मिटवावे असे अावाहन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी पक्षकारांना केले.
