उरुळी कांचन -(हवेलीनामा वृत्तसेवा) उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सोरतापवडी(ता.हवेली) मधील अज्ञात चोरट्याने पहाटे एटीएम फोडून रोकड लंपास केली आहे.याबाबतची तक्रार बँकेचे शाखाधिकारी बबलेशकुमार रामचरण मीना यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडीफाटा येथील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेजारील ए. टी. एम मशीन दोन अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून गॅस कटरच्या साहाय्याने फोडून मशीन मधील ५ लाख ९२ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केले असून यामध्ये 100/- रू दराच्या 1230 नोटा 200 रूपये दराच्या 87 नोटा, 500 रुपये दराच्या
904 नोटा अशा चलनी नोटा मिळून एकूण ५,९२,४००रुपांची रोख रक्कम चोरुन नेली आहे याबाबत पुढील तपास उरुळी कांचन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील करत आहे.
