थेऊर (हवेलीनामा वृतसमूह ) एकात्मिक बालविकास सेवा यजणे अंतर्गत कुंजीरवाडी गटातील थेऊर,कुंजीरवाडी,आळंदी (म्हातोबा) गावातील अंगणवाडीत शिकणाऱ्या बालचमुंचा आनंद मेळावा पुणे सोलापूर महामार्गांवर थेऊर फाटा येथील जिजाऊ मंगल कार्यालयात पार पडला.

यावेळी मंचावर आळंदीच्या सरपंच सोनाली जवळकर, कुंजीरवाडीचे सरपंच हरेश गोठे,माजी सरपंच सचिन तुपे,युवराज काकडे,गोरख तुपे,आण्णा खेंडकर, प्रकाश घुले,मिलिंद कुंजीर,गोरख घुले, कैलास तुपे, वाल्मीक जवळकर, अर्चना धुमाळ,साधना कुंजीर, जयश्री कुंजीर,काळुराम कुंजीर, सारिका गाढवे,लता कुदळे, सविता भुजबळ, शुभम तुपे,बालविकास प्रकल्प अधिकारी कुणाल धुमाळ, विस्तार अधिकारी सुहास मोरे, पर्यवेक्षक शुभांगी पवार उपस्थित होते.

महिला व बालविकास अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांतर्गत असलेल्या बेटी बचाव, मुलीच्या जन्माचे स्वागत यातील एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन दांपत्याचा सत्कार करण्यात आला.

कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांनी महिलांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले अनेक पालक आपल्या पाल्यास शाळेत सोडताना रस्त्यावर दुचाकी उभी करून मुलासमोर मद्य विक्री दुकानातून दारू पिऊन येत असल्याचे चित्र पहाव्यास मिळत आहे आपल्या मुलासमोर कोणत्याही पालकांनी कसलेही व्यसन करू नये ज्यामुळे आपल्या मुलांवर वाईट संस्कार होतील याची खबरदारी त्यांनी घेणे आवश्यक आहे परंतु सध्याचे चित्र अतिशय वाईट असल्याचे त्यांनी नमूद केले यावर महिलांनी याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केली.

थेऊरचे ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी अंगणवाडीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात काहीतरी भेटवस्तू देण्याचा मानस व्यक्त केला कारण हे छोटी पिढी भविष्यामधील अनेक पदावर विराजमान होणार आहेत त्यांचा पाया भक्कम होण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याची गरज आहे आणि हे साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी यावेळी नमूद केले.

यात अंगणवाडीतील बालकांनी अतिशय उत्कृष्ट अशी महाराष्ट्राच्या लोकधारा कार्यक्रमाचे सादरीकरण केले यात सुरुवात श्री गणेशाच्या वंदनाने झाली. लहान मुलामुलींनी कोळीगीत,हिंदी गीते,जोगवा रेकार्ड गीत,शेतकरी गीत,राष्ट्रभक्तीपर गीत अशा वेगवेगळ्या गीतांवर ठेका धरत नृत्य केले अतिशय सुंदर असा नृत्याचे सादरीकरण केले.पालक वर्ग तसेच मान्यवर यांनी या चिमुकल्यांचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन दिले.

गटातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आपल्या अंगणवाडीतील बालकांची संपूर्ण तयारी करून घेतली होती बालकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. यावेळी पालक,लहान विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *