थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवडणूकीचा कार्यक्रम आज पार पडला यात सुरेखा दत्तात्रय गाढवे यांची उपसरपंच पदी निवड झाली

ग्रामपंचायत कुंजीरवाडीत एकूण 17 सदस्य आहेत.रिक्त उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज सोमवार दिनांक 03/03/2025 रोजी पार पडली यामध्ये सरपंच हरेश श्यामराव गोठे यांनी अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहिले या निवडणुकीमध्ये सागर यशवंत निगडे व श्रीमती सुरेखा दत्तात्रय गाढवे या दोन सदस्यांचे अर्ज राहिल्याने निवडणूक घ्यावी लागली या निवडणुकीत सागर निगडे यांना 6 मते व श्रीमती सुरेखा गाढवे यांना 10 मते मिळाली अध्यासी अधिकारी यांनी श्रीमती सुरेखा गाढवे यांना उपसरपंच म्हणून विजयी घोषित केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पूर्व हवेळीतील प्रसिद्ध मंडप व्यावसायिक नितीन गाढवे यांच्या त्या मातोश्री आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *