लोणी काळभोर-(हवेलीनामा वृत्तसेवा)  नेहा‘ज क्लासेस चा ५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी लोणी काळभोर येथील नेहाज अकॅडमी या कला शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक वर्धापन दिन सोहळा हॉटेल ग्रँड 11 येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या अकॅडमीत पेटी…तबला.. पखवाज…गायन…वादन.. भरतनाट्यम नृत्य.. चित्रकला..असे विविध वर्ग घेतले जातात.तसेच गणेश उत्सवात शाडू .मातीपासून गणेश मूर्ती कार्य शाळा चे आयोजन करून पर्यावरण जपण्याचा संदेश दिला जातो.मुलांना शिक्षणा सोबत आपल्या भारतीय शास्त्रीय विषयांचे ही ज्ञान असावे हा आमचा उद्देश आहे. कार्यक्रमास प्रमूख अतिथी म्हणून रेम्बो स्कूल चे संस्थापक  नितीन काळभोर व मंत्र गुरुकुलम चे संस्थपक  कासार सर, देव गंधार म्युझिक अकॅडमी चे  आकाश तुपे, महावीर मतिमंद निवासी विद्यालय मुख्याध्यापिका अर्चना मॅडम उपस्थित होत्या. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे शास्त्रीय संगीत तसेच भरतनाट्यम नृत्याचा आविष्कार विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आला.आपल्या संस्कृतीचा वारसा म्हणजे शास्त्रीय संगीत तसेच शास्त्रीय नृत्य जपण्याचे काम ही संस्था करत आहे त्याबद्दल संस्थेचे अभिनंदन आणि कौतुक या कार्यक्रमासाठी पालकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अकॅडमी चे संगीत शिक्षक रेखा सरोदे, तबला शिक्षक  पालखे, नृत्य गुरु तेजश्री  वडके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.सूत्रसंचालन पूनम  भोसले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *